वाघांच्या हल्ल्यात युवक, बिबट्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

leopard killed in tiger attack

वाघांच्या हल्ल्यात युवक, बिबट्याचा मृत्यू

गडचिरोली - जिल्ह्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघाने एका युवकाला तसेच बिबट्याला ठार केले आहे. पहिली घटना तालुक्यातील पोर्ला वनपरिक्षेत्रातील वनकक्ष क्र. ६ मधील राखीव जंगल परिसरात रविवार (ता. २६) घडली. सरपणासाठी गेलेल्या एका युवकाला वाघाने ठार केले. किशोर तुळशीदास मामेडवार (वय ३०) रा. पोर्ला, असे मृताचे नाव आहे.

माहिती मिळताच वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. दुसऱ्या एका घटनेत गडचिरोली वनपरिक्षेत्रातील गडचिरोली बिटामधील कक्ष क्रमांक १७१ मध्ये रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वनकर्मचाऱ्यास गस्तीदरम्यान बिबट्याचा मृतदेह आढळून आला.

माहिती मिळताच उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक सोनल भडके, वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, क्षेत्र सहायक श्रीकांत नवघरे, वनरक्षक बी. पी. राठोड, भसारकर, गौरव हेमके यांनी स्थळाची पाहणी केली. मृतदेह असलेल्या परिसरात वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या. त्यामुळे वाघाच्या हल्ल्यात हा बिबट ठार झाल्याचा प्रथमदर्शनी अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

पशुधन विकास अधिकारी डॉ. चेतन नंदनवार व डॉ. श्रद्धेय शिरणकर यांनी शवविच्छेदन करून रासायनिक तपासणीकरिता नमुने घेतले आहेत. मृत बिबट्याच्या शरीरावरील जखमांवरून पट्टेदार वाघाने हल्ला करून बिबट्यास ठार केल्याचा प्राथमिक अंदाज डॉ. चेतन नंदनवार व डॉ. श्रद्धेय शिरणकर यांनी व्यक्त केला.

Web Title: Youth Leopard Killed In Tiger Attack

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..