ST Worker Srtike : नंदुरबार जिल्ह्यातील २३ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Worker Srtike
नंदुरबार जिल्ह्यातील २३ कर्मचाऱ्यांचे निलंबन

ST Worker Srtike : नंदुरबार जिल्ह्यातील २३ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : जिल्ह्यात ३ नोव्हेंबर मध्यरात्रीपासून संप पुकारून कामबंद आंदोलनात सहभागी झालेल्या २३ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबार आगारातील पाच, शहादा आगारातील सहा, अक्कलकुवा आगारातील सात आणि नवापूर आगारातून पाच अशा एकूण २३ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

हेही वाचा: मुंबई मनपाला अध्यादेशाची प्रतीक्षा; निवडणूक लांबणीवर पडणार?

राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने समिती नेमण्याबाबत अधिसूचना काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही. अखेर एसटी महामंडळाच्या विभागीय पातळीवरून गुरुवारी कारवाईचा बडगा उगारत नंदुरबार जिल्ह्यातील ४ आगारांतील २३ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.

निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नंदुरबार बस आगारातील पाच, तर शहादा आगारातील सहा, नवापूर आगारातील पाच, तर अक्कलकुवा आगारातील सात जणांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील प्रवासी एसटीवरच अवलंबून आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे या आणि अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील चार आगारांतील वाहतूक ठप्प झाली आहे. महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

हेही वाचा: "EDने वक्फ बोर्डाच्या 30 हजार संस्थांची चौकशी करावी"

"संपात सहभागी झाल्यामुळे आज दुपारी आम्हाला निलंबित केले आहे. हा संप फोडण्यासाठी दडपशाहीचा प्रयत्न सुरू आहे. मात्र फासावर लटकविले तरी चालेल. आम्ही आता माघार घेणार नाही."

-राकेश बेडसे, निलंबित वाहक, नंदुरबार

loading image
go to top