ते गेले होते मोहफूल वेचायला...पण नक्षलवाद्यांनी घातल्या गोळ्या

naxal
naxal

कोरची /सिरोंचा (जि. गडचिरोली)  :  शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना आज सकाळी कोरची तालुक्यातील कोटगुल येथे घडली. दरम्यान कमलापूर गावालगत सुरू असलेल्या कामावरील मजूरांना मारहाण करुन टँक्टरची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याने जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरले आहे.


 जिवता गणपत रामटेके (वय45 ) रा.कोटगुल असे नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जीवता व त्याची पत्नी नीलम रामटेके हे दाम्पत्य आज सकाळी  कोहका मोकासा येथे असलेल्या शेत शिवारात मोहफुल गोळा करण्यासाठी गेले होते. दरम्यान तेथे काही शस्ञाधारी नक्षलवादी पोहोचले. तुम्ही पोलिसांना आमच्याबद्दल माहिती पुरवली असे म्हणून नक्षलवाद्यांनी जिवता रामटेके यांच्यावर गोळ्या झाडल्या. सध्या सर्वञ लाँकडाऊन असले तरी ग्रामीण  भागातील नागरिक मोहफुले गोळा करण्यासाठी शेतशिवारात जात आहेत. रामटेके दाम्पत्यही नेहमीप्रमाणे आज सकाळी  कोहका -मोकासा परिसरात असलेल्या शेतात गेले असता तिथे एक महिला नक्षलवादी टोपली घेऊन मोहफुल गोळा करीत असल्याचे दिसले.

या दोघांना बघताच ती त्यांच्या जवळ आली  तिने नीलम रामटेके यांना त्यांचे पतीचे नाव विचारले,त्यानंतर निलमला दोन नक्षलवाद्यांनी पकडून ठेवले व तिच्या पतीला  दोनशे मीटर अंतरावर नेऊन त्यांच्या डोक्यात  गोळ्या घातल्या. घटनेनंतर नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. पती जिवंत असल्याचे  लक्षात येताच तिने गाव गाठून प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल येथील रुग्णवाहिका घेऊन जखमी पतीला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.माञ,तेथे  कसल्याही प्रकारचे उपचार न करता कोरची येथील ग्रामीण  रुग्णालयात रेफर केले.  परंतु  जीवता रामटेके यांचा वाटेतच मृत्यू झाला. जिवता रामटेके यांना एक मुलगा व दोन मुली असून मनीषा नावाच्या मुलीचे लग्न 26 एप्रिलला ठरले होते.

सर्वत्र भीतीचे  वातावरण

एकीकडे जगभरात कोरोना प्रादुर्भावाची दहशत आहे तर  कोरची तालुक्यात एकाच आठवड्यात नक्षलवाद्यांनी  पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून दोन नागरिकांची  हत्या केली. त्यामुळे सर्वञ भीतीचे  वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा तपास कोरची पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली  कोटगुल पोलिस मदत केंद्राचे पोलिस अधिकारी राऊत करीत आहेत. दुसरी घटना अहेरी तालुक्यातील कमलापूर तसेच कीष्टापूर परिसरात घडली असून नक्षलवाद्यांनी काल राञी रस्त्याच्या कामावरील मजुरांना मारहाण करून वाहनांची जाळपोळ केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com