#SaturdayMotivation मानसीचा चित्रकार तो...

सुषमा सावरकर
शनिवार, 14 डिसेंबर 2019

सासरी फावल्या वेळेत घराजवळच्या लहान मुलांना त्या आवड म्हणून संस्कार व चित्रकलेचे धडे देऊ लागल्या. 2006 मध्ये पतीची बदली नागपूरला झाली. नेहा यांनी कलेकडे झालेलं दुर्लक्ष परत पूर्ववत करण्याचं ठरविलं. मुंबईला जाऊन त्यांनी चित्रकलेले विविध प्रकार आत्मसात केले. घरी पेंटिंग करणे सुरू केले.

नागपूर : कला कलाकाराचे जीवन समृद्ध करते आणि कलाकार समाजजीवन समृद्ध करीत असतात. हवा,अन्न आणि पाणी जसे शरीराच्या पोषणासाठी आवश्‍यक असतात. तसेच कला ही मानसिक पोषणासाठी आवश्‍यक असते. प्रत्येक व्यक्‍तीमध्ये कुठली न कुठली तरी कला सुप्त रुपात असते, केवळ ती जोखून त्याला आयाम देणे आवश्‍यक असते. आणि त्यासाठी आवश्‍यकता असते रत्नपारखी नजरेची.

सुमी, कॉफी, मधुबनी, वारली, स्केचिंग, कॅलीग्रॅफी, कॅनव्हॉस पेंटिंग्स, केरला म्युरल आर्ट, गोंड मंडल आर्ट, डॉट कॅनव्हॉस, ऑइल ऍक्रेलिक, वॉटर कलर, फॅब्रिक पेंटिंग, टेरेकोटा अशा विविध चित्रकारी आपल्या कुंचल्यातून चितारणाऱ्या नेहा मुंजे या अशाच जगावेगळ्या कलाकार. चित्रकलेचे विविध प्रकार त्यांनी आत्मसात केले आहेत आणि त्या सगळ्यांवरच त्यांचे प्रभुत्व आहे. आतापर्यंत दोनशेच्या वर प्रदर्शनांमध्ये आपली चित्रकला सादर करणाऱ्या नेहा यांनी 2018 साली आर्टिस्टिका कलेक्‍शन नावाने स्वत:चे चित्रप्रदर्शन भरवले.

 

ब्रेकिंग - नवलच की! चक्‍क साप खातो कापूस

 

मराठी व समाजशास्त्र विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या नेहा मुंजे 51 वर्षीय फाइन आर्ट व चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पेंटिंगचे धडे देतात. 1990 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. पती एलआयसीमध्ये नोकरीला. सासरी फावल्या वेळेत घराजवळच्या लहान मुलांना त्या आवड म्हणून संस्कार व चित्रकलेचे धडे देऊ लागल्या. 2006 मध्ये पतीची बदली नागपूरला झाली. नेहा यांनी कलेकडे झालेलं दुर्लक्ष परत पूर्ववत करण्याचं ठरविलं. मुंबईला जाऊन त्यांनी चित्रकलेले विविध प्रकार आत्मसात केले.

 

उघडून तर बघा - अबब... चोरट्यांकडे सापडले सात पिस्तूल, 118 काडतूस

 

घरी पेंटिंग करणे सुरू केले. शहरातील एका कार्यालयात प्रदर्शन लागले असता त्यांचा पेंटिंगचा एकमेव स्टॉल तिथे होता. त्यावेळी अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. त्यावेळी मी एक दिवस स्वतः प्रदर्शन आयोजित करेन व त्यावेळी तुम्ही तुमच्या पेंटिंग्स तिथे लावाल, असे त्यांनी खिल्ली उडविणाऱ्यांना म्हटले होते. बरीच वर्षे प्रदर्शनातील माझा स्टॉल कुणाला आवडला नाही, असंही त्या हसत सांगतात. त्यावेळी पेंटिंग विकत घ्यायला नाही; मात्र शिकण्याकरिता अनेक महिला तयार असायच्या. त्यातुनच चित्रकलेच्या शिकवणीवर्गाची सुरुवात झाली. गेल्या दहा वर्षांपासून त्या विविध पेंटिंग्सचे क्‍लास घेतात. हा सगळा प्रवास केवळ गेल्या 13 वर्षांतील आहे.

कौन कहेता है आसमान मे सुराख नही होता
एक पत्थर तो तबियत से उछालो यारो
अशीच कहाणी आहे चित्रकार नेहा मुंजे यांच्या जिद्दीची. अडचणींवर मात करीत त्यांनी त्यांची चित्रकला जापासली आणि वाढवलीही.

विद्यार्थ्यांकडून गिरवतात चित्रकलेचे धडे

  • मधुबनी ते टेराकोटा असे चित्रकलेचे तेरा प्रकार अवगत
  • 2018 पर्यंत दोनशेच्या वर प्रदर्शनांमध्ये सहभाग
  • आर्टिस्टिका कलेक्‍शन नावाचे स्वत:चे चित्रप्रदर्शन
  • फाईन आर्ट व चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन

कलेच्या माध्यमातून व्यवसायही
साड्या, प्लेट्‌स, विविध प्रकारची भांडी, छत्री, कॅनव्हॉस, ओढणी, इतर कपडे, अशा अनेक प्रकारच्या वस्तूंवर पेंटिंग्स केल्याने अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पेंटिंग्सच्या माध्यमातून भारतीय चित्रकलेला मला जगभर पोहोचवायचं आहे. मी स्वत:ची वेबसाईटही तयार केली आहे. अनेक आई-वडील मुलांची आवड निवड न बघता त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना करिअर करायला लावतात. मात्र, मुलांना त्यांच्या आवडीने शिक्षण घेऊ दिल्यास ते त्या क्षेत्रात भरारी घेतातच, याची मला खात्री आहे.
-नेहा गिरीष मुंजे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neha teach a drawing