
यंदाच्या खरीप हंगामात पावसामुळे पिकांची मोठी हानी झाली. मूग, उडीद व सोयाबीनसह कापसाला फटका बसला. नवीन तुरीचे बाजारात आगमन झाले असून हमीदराच्या तुलनेत भाव चढलेले आहेत.
बोंबला! खुल्या बाजारातील तेजीमुळे शासनाला तूर मिळणे कठीण, डाळ महागण्याची शक्यता
अमरावती : तुरीची शासकीय नोंदणी सुरू असली; तरी खरेदी मात्र अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. जिल्ह्यात बारापैकी केवळ दोन केंद्रांचा आरंभ आतापर्यंत झाला आहे. शेतकऱ्यांनी मात्र खुल्या बाजारातील तेजीमुळे त्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे यंदा शासनाला मूग, उडीद व सोयाबीनपाठोपाठ तूरही मिळण्याची शक्यता धूसर आहे. भविष्यात याचा परिणाम तूरडाळीचे भाव चढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात पावसामुळे पिकांची मोठी हानी झाली. मूग, उडीद व सोयाबीनसह कापसाला फटका बसला. शासनाने हमीदराने खरेदी करण्यासाठी नोंदणी व खरेदी सुरू केली असली; तरी मूग, उडीद व सोयाबीन शासनाला मिळू शकलेला नाही. जिल्ह्यात दर्यापूर केंद्रावर फक्त १२ क्विंटल सोयाबीन विक्री केला गेला.
अवश्य वाचा - मोझरीनजीक पोलिसांनी सिनेस्टाईल पकडला चार लाखांचा जुगार; १६ आरोपींवर गुन्हे दाखल
पावसाने दगा दिल्याने तुरीवर असलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा सध्या बऱ्यापैकी पूर्ण होत आहेत. नवीन तुरीचे बाजारात आगमन झाले असून हमीदराच्या तुलनेत भाव चढलेले आहेत. सुपर दर्जाच्या तुरीला सहा हजार ते 6 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळू लागला आहे. अमरावतीसह जिल्ह्यातील इतर बाजार समितीत असेच भाव आहेत.
शासनाने 20 जानेवारीपासून तुरीच्या शासकीय खरेदीचे आदेश काढले आहेत. बारा केंद्र त्यासाठी सुरू केले आहेत. बुधवारपर्यंत यातील तिवसा व अमरावती ही दोनच केंद्रे प्रत्यक्षात सुरू झालीत. मात्र उद्घाटनालाही तूर विक्रीसाठी आली नाही. जिल्ह्यात बारा शासकीय केंद्रांवर 9 हजार 215 तूर उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
अमरावती येथील केंद्रावर 1431 व तिवसा येथील केंद्रावर 724 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी यातील एकाही शेतकऱ्याने शासकीय केंद्रावर तूर विक्रीसाठी आणलेली नाही. इतर दहा केंद्रांचा शुभारंभ अद्याप झालेला नाही.
हेही वाचा - चिखलदऱ्याचा रस्ता गेला खड्ड्यात, आमदारांवरच आली...
शासनाला तूरडाळ मिळणे कठीण
शासन दरवर्षी हमीदराने सुपर दर्जाची 33 टक्के तूर विकत घेते. याचा उपयोग नंतर सार्वजनिक वितरणप्रणालीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना स्वस्त दरात डाळ विकण्यात येते. यंदा मात्र शासनाला तूर मिळण्याची शक्यता फार कमी आहे. खासगी खरेदीदारांनी बाजारात येणाऱ्या नवीन तुरीला हमीदराच्या तुलनेत चढे दर दिले असल्याने शेतकऱ्यांनी तूर विक्रीचा मोर्चा खासगी बाजाराकडे वळविला आहे. तीन महिन्यांपूर्वी तूरडाळ शंभर रुपयांवर गेली होती. सद्यःस्थितीत ती 89 ते 90 रुपये किलो आहे.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
Web Title: No Chances Government Getting Tur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..