चार महिने काम; बाकी हे धर अन् ते सोड!; बेरोजगारांची फौज

चार महिने काम; बाकी हे धर अन् ते सोड!;  बेरोजगारांची फौज

सडक अर्जुनी (जि. गोंदिया) : १५ ऑगस्‍ट १९९२ रोजी सडक अर्जुनी तालुक्‍याची निर्मिती झाली. २९ वर्षे लोटूनही तालुक्यात एमआयडीसी नसल्‍याने येथील विकास शून्‍य आहे. राेजगाराची साधने उपलब्‍ध नाहीत. त्यामुळे पोटासाठी अनेकांना स्थलांतर करावे लागते. हे चित्र कधी पालटेल, असा प्रश्‍न तालुकावासीयांना पडला आहे. सडक अर्जुनी शहर राज्य महामार्ग क्रमांक सहावर आहे. त्यामानाने तालुक्याचा विकास शून्य आहे. या आदिवासीबहुल तालुक्यात शेती हाच नागरिकांच्या जगण्याचा एकमेव आधार आहे.

धानपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील नागरिकांच्या हाताला फक्त चार महिने काम मिळते. उर्वरित आठ महिने त्यांना हे धर, ते सोड अशीच कामे करावी लागतात. पावसाळ्याच्या दिवसांत चार महिने गावी आणि उर्वरित दिवस कामाच्या शोधात शहरात बस्तान असल्याने मुलांचे शिक्षणही धड होत नाही. नावाला एकमेव बुरड व्यवसाय आहे. परंतु बदलत्या काळात सूप, टोपल्या, परडी, तट्टे यांना मागणीच नाही. त्यातही शासनाकडून या व्यवसायासाठी बांबू उपलब्ध होत नाही. त्यामुळे एमआयडीसीची निर्मिती होऊन रोजगारांची गंगा प्रवाहित व्हावी, ही एकमेव आशा नागरिकांना आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे जातीने लक्ष देऊन तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या विकास करणे गरजेचे आहे.

चार महिने काम; बाकी हे धर अन् ते सोड!;  बेरोजगारांची फौज
वृद्ध दाम्पत्याचे हातपाय बांधून दागिन्यांसह रोख लंपास, पोलिसांत तक्रार दाखल

सडक अर्जुनी आदिवासी, नक्षलग्रस्‍त तालुका आहे. येथील नागरिकांचा मुख्य व पारंपरिक व्‍यवसाय शेती आहे. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे पाहिजे त्या प्रमाणात शेतीतून उत्पन्न घेता येत नाही. शेतीव्‍यतिरिक्त काेणतेही उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे शेतीची कामे आटोपल्यानंतर शेतकरी, शेतमजूर इतकेच नव्‍हे तर युवकही रोजगारासाठी शहराकडे धाव घेतात. तालुकावासीयांचे होणारे स्‍थलांतर थांबावे, याकरिता तालुक्यात एमआयडीसी उभारून परिसराचा औद्याेगिक विकास करण्याची मागणी जोर धरत आहे.

१०८ गावे, परंतु रोजगार शून्य

तालुक्‍यात १०८ गावांचा समावेश असताना उद्योग शून्य आहे. लाेकसंख्या १ लाख १५ हजार ५९४ आहे. एकूण कुटुंब संख्या २५ हजार ६६ असून त्यात १४ हजार ४३३ दारिद्र्यरेषेखालील कुटुंब आहेत. तीन-चार गावांमध्ये बुरड व्यवसाय आहे. त्या माध्यमातून बुरड कामगार सूप, टोपल्या, तट्टे आदी वस्‍तू तयार करून त्यावर उदरनिर्वाह चालवितात. त्यांना शासनाकडून वेळेवर बांबूदेखील उपलब्ध होत नाही. काेराेनामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला. भौगोलिक क्षेत्र ५५१३२.०० हेक्टर आर. असून सिंचनाखालील क्षेत्र १२७५२५.०० हेक्टर आहे. ८८.२९.०० हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे. १९८६५.०० हेक्टर खरीप पिकाखालील आहे. ३३.७५.१५ हेक्टर रब्बी पिकाखालील असून, ११२४५.७७ हेक्टर क्षेत्र उन्‍हाळी पिकाखालील आहे.

चार महिने काम; बाकी हे धर अन् ते सोड!;  बेरोजगारांची फौज
शेतीच्या वादातून मोठ्या भावाचा खून; लहान भावास अटक

२९ वर्षांपासून ठोस पाऊल नाही

शेती निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. शेती पिकली नाही तर शेतकरी कर्जबाजारी होतो. परिणामी शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळसुद्धा येते. शेतीची कामे आटोपल्यानंतर शेतमजूर, युवक, शेतकरी रोजगारासाठी शहराकडे धाव घेतात. कोराेना काळात नागरिकांचा रोजगार व उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला. तालुक्यात कोणतेही लघु किंवा मोठे उद्योग नाहीत, परिणामी दिवसेंदिवस बेराेजगारांची संख्या वाढत आहे. रोजगारासाठी मोठ्या शहरात, दुसऱ्या राज्यात स्‍थलांतरित होत आहेत. येथील मजुरांच्या स्‍थलांतरणामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तालुक्याच्या निर्मितीला २९ वर्षे पूर्ण झाली. परंतु शासनातर्फे अद्याप काेणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही.

मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग सहालगत कोहमारा-गोंदिया राज्य मार्गावर सडक अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण आहे. सडक अर्जुनीपासून तीन किलोमीटर सडक अर्जुनी तालुक्यात एमआयडीसीची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तालुक्यात एमआयडीसी झाल्यास अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे परप्रांतात जाणारे मजूर, शेतकरी, युवकांचे स्थलांतर थांबेल. एमआयडीसीसाठी मी प्रयत्नशील आहे.
- मनोहर चंद्रिकापुरे, आमदार, अर्जुनी/मोर. विधानसभा क्षेत्र
चार महिने काम; बाकी हे धर अन् ते सोड!;  बेरोजगारांची फौज
बुलडाणा जिल्ह्यावर पुन्हा शोककळा; २४ तासांत दुसरा सैनिक शहीद
सडक अर्जुनी तालुक्यात एमआयडीसी झाल्यास रोजगार निर्मिती होऊन या भागाचा औद्योगिक विकास होईल. बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल. उद्योगनिर्मितीतून नागरिकांचे स्थलांतर थांबल्यास अर्थकारणाला बळ मिळेल.
- उषा चौधरी, तहसीलदार, सडक अर्जुनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com