esakal | आनंदवार्ता : विदर्भात या जिल्ह्यात गेला होता कोरोनाचा पहिला बळी; आता झाला कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

corona free buldana.jpg

रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर सामान्य रुग्णालयातून त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तो विदर्भातील पहिला कोरोना बळी ठरला होता.

आनंदवार्ता : विदर्भात या जिल्ह्यात गेला होता कोरोनाचा पहिला बळी; आता झाला कोरोनामुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : येथील महिला सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शेवटच्या तीन कोरोना बाधितांना आज सुट्टी देण्यात आली आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आल्याने बुलडाणा जिल्हा सध्या तरी कोरोना मुक्त झाला असल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहिर करण्यात आले.

बुलडाण्यामध्ये 29 मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला होता. त्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर सामान्य रुग्णालयातून त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तो विदर्भातील पहिला कोरोना बळी ठरला होता. त्यानंतर दर दोन-चार दिवसात रुग्णांची भर पडून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 24 पर्यंत पोहोचली होती. त्यामध्ये बुलडाणा, चिखली, मलकापुर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, शेगाव खामगाव व मलकापूर या तालुक्यामधील रुग्णांचा समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्याला कोरोनाने विळखा घातला होता.

आवश्यक वाचा - हृदयद्रावक : घरी जाण्याचा परवाना मिळाल्याने झाला होता आनंद, मात्र घरी पोहोचण्याआधीच क्षणार्धात बदलला दुःखात

या सर्व रुग्णांवर बुलडाणा व शेगाव येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. टप्प्याटप्प्याने नमुने निगेटिव्ह आल्यानंतर या रुग्णांना सुट्टी देण्यात आली. सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 20 झाली होती, मात्र त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून आलेल्या तबलीगी जमातीच्या तीन रुग्णांची भर पडली आणि बुलडाण्याची काळजी वाढली होती. या तिघांचेही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना तिघांनाही आज सुट्टी देण्यात आली.

हेही वाचा - अरे हे काय! परप्रांतिय कामगारांची हे पण कारतायेत लुट; असा घडतोय प्रकार

यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रेमचंद पंडित यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. या रुग्णांना सुटी देतानाच आपला जिल्हा आता कोरोना मुक्त झाला आहे. आज घडीला जिल्ह्यात एकही रुग्ण असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याने जिल्हा कोरोना मुक्त झाला असला तरी आपली जबाबदारी संपलेली नाही पुढील काळातही योग्य ती खबरदारी घेतलीच पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

तर जिल्हा शल्यचिकित्सकांनी देखील सुरुवातीपासून रुग्णांची संख्या रुग्णांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती देत आज आपल्याकडे एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसल्याचे सांगितले. काही नमुन्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी असले तरी आज मात्र जिल्ह्यात एकही कोरना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याने आपल्या आयुष्यातील हा सर्वात मोठा क्षण असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी यावेळी सांगितले.

loading image