esakal | आता बसणार गैरप्रकाराला आळा; शिक्षक ठेवतील यांच्यावर नजर
sakal

बोलून बातमी शोधा

dhan

अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे शिधापत्रिकाधारकांना मिळत असलेल्या अन्नधान्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून आता रास्त भाव दुकानदारांवर गावातील किमान एक शिक्षक अन्न वाटप कामकाजावर नियंत्रण ठेवणार आहे.

आता बसणार गैरप्रकाराला आळा; शिक्षक ठेवतील यांच्यावर नजर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पातूर (जि. अकोला) : अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे शिधापत्रिकाधारकांना मिळत असलेल्या अन्नधान्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून आता रास्त भाव दुकानदारांवर गावातील किमान एक शिक्षक अन्न वाटप कामकाजावर नियंत्रण ठेवणार आहे.

क्लिक करा- काय म्हणता, चक्क सावली होणार गायब

रास्तभाव दुकानदरांना दिले आहेत निर्देश
अन्न धान्य वितरणात होणाऱ्या गैरप्रकाराला निश्‍चितच आळा बसणार असल्याचा विश्‍वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभाग अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना पॉस मशीनद्वारे कार्डधारकांची बायोमेट्रिक पडताळणी करून धान्य वस्तुंचे नियमित वाटप केले जाते. परंतु, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी न करता रास्त भाव दुकानदारांनी स्वतःची आधार अधीप्रमाणित करून धान्य वाटपाची सुविधा लॉकडाउन संपेपर्यंत उपलब्ध करून दिली आहे. या पद्धतीद्वारे वाटप करताना कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी रास्त भाव दुकानदारांना निर्देश दिले आहेत.

हेही वाचा- धक्कादायक ः वाळू माफियाचा प्रताप; पोलिस कर्मचाऱ्याला टिप्परखाली चिरडले

दैनंदिन कामकाजाचा द्यावा लागणार अहवाल
सद्यस्थितीत धान्य वितरण याबाबत तक्रारी येत आहेत गावोगावी जाऊन चौकशी व कारवाई करणे, नियमित पुरवठा कामकाज सांभाळून अडचणीचे होत असल्यामुळे यावर ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने रास्त भाव दुकानदारासाठी संबंधित गावासाठी किमान एका शिक्षकाची नियुक्ती अन्न वाटप कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी केली आहे. नियुक्त केलेल्या मुख्याध्यापक, शिक्षकांना योजनानिहाय दिल्या जाणारे अन्नधान्य, आकारला जाणारा दर, धान्याची पावती, धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्सचे पालन करण्यासाठी आखनी तसेच मोफत धान्य वाटप इत्यादीवर नियंत्रण ठेवायचे असून दैनंदिन कामकाजाचा अहवाल द्यावा लागणार आहे.


94 शिक्षकांची नियुक्ती
रास्त भाव दुकानदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यातील 94 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका डीलर मागे एका शिक्षकाची नजर राहणार आहे. त्यामुळे यात होणाऱ्या गैरप्रकाराला निश्‍चित आळा बसणार आहे.

loading image