तरुणाला विद्युत तारांवर दिसला मांजा, पण हात लावताच झाला मृत्यू

one died by electric shock in wardha
one died by electric shock in wardha

वर्धा : विद्युत वाहिनीवर अडकलेला मांजा काढण्यासाठी गेलेल्या व्यक्‍तीचा विजेचा धक्‍का बसल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना पिपरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कॉलनी येथे मंगळवारी (ता. 27)सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. सचिन नारायण डुकरे (वय 38), असे मृत व्यक्‍तीचे नाव आहे. 

सचिन हा परिसरात केबल वाहिनीचे काम करीत होता. याच कामादरम्यान त्याला येथील 11 केव्हीच्या वीजतारांवर नायलॉन मांजा दिसला. तो काढण्याचा त्याने प्रयत्न केला. यात त्याचा स्पर्श वीज तारांना झाला. यात त्याला विजेचा जबर धक्‍का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य राजेश राजूरकर यांनी पोलिसांसह महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली. यावेळी सरपंच अजय गौळकर यांच्यासह परिसराच्या सदस्य भारती गडेकर यांची उपस्थिती होती. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना होताच त्यांनी येथे एकच गर्दी केली होती. मनमिळावू असलेल्या सचिनच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे. 

घरांच्या छताजवळून गेलेल्या तारांना सुरक्षा द्या - 
घटना घडली त्या घराच्या छतापासूनच ही 11 केव्हीची लाइन गेली आहे. या घरातील मंडळी नेहमीच छतावर जातात. यावेळी येथे अनुचित घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळे येथून गेलेल्या तारांपासून सुरक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. याकडे महावितरणने दुर्लक्ष केल्यास आणखी दुसरी घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com