अरेरे...कांदा लागवडीचाही होणार वांदा!

दत्ता महल्ले
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

जिल्ह्यातील शेतकरी खरिपातील कांदा लागवडीपेक्षा रब्बी हंगामात कांदा लागवड करून, उन्हाळ्यात कांद्याची काढणी करतो. रब्बी हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कांद्याचे बीज नोव्हेंबर महिन्यातच टाकल्या गेले होते.

वाशीम : यंदा कांद्याच्या दराने शंभरी पार केली. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या घामाला योग्य मोबदला मिळाला. ही बाब पाहता जिल्ह्यात यंदा कांदा लागवडीचे क्षेत्र वाढीचा अंदाज होता. मात्र, वातावरणातील बदलाने कांद्याची रोपे जळाली आहेत. तर शेतातील उभ्या रोपांवर धुक्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे ही रोपे देखील खराब झाली आहेत. त्यामुळे कांदा लागवडीचाही वांदा होतो की काय? असा प्रश्‍न कांदा उत्पादकांसमोर उपस्थित झाला आहे. 

जिल्ह्यात प्रामुख्याने रब्बी हंगामात कांद्याची लागवड केली जाते. हा कांदा उन्हाळ्यातील एप्रील -मे महिन्यात काढणीला येतो. तसेच या कांद्याची वर्षभर साठवणूक सुद्धा शक्य असते. कारण, उन्हाळी कांद्याचा दर्जा चांगला असल्यामुळे तो दीर्घकाळ चांगला राहतो. हीबाब पाहता जिल्ह्यातील शेतकरी खरिपातील कांदा लागवडीपेक्षा रब्बी हंगामात कांदा लागवड करून, उन्हाळ्यात कांद्याची काढणी करतो. रब्बी हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कांद्याचे बीज नोव्हेंबर महिन्यातच टाकल्या गेले होते.

क्लिक करा - पशुसंवर्धन विभागाच्या पदभरतीला वर्षोगणती ग्रहण

ढगाळ वातावरण व धुक्याचा परिणाम
परतीच्या पावसानंतर सारखे ढगाळी वातावरण, धुके, वातावरणातील दमटपणा आदी कारणांमुळे कांदा बिजाच्या उगवणशक्तीवर परिणाम झाला. तर दमटपणामुळे कोवळ्या रोपांची चांगली वाढ झाली नाही. त्यामध्येही जी रोपे तग धरून उभी आहेत. ही रोपे धुक्यामुळे पांढरी पडली असून, कांद्याची पात पूर्णतः खराब झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अपेक्षीत केलेली लागवड देखील या रोपांपासून होणे शक्य नाही. तर खुले गावरान कांदा बीज देखील उपलब्ध होत नसल्याने कांदा उत्पादक चिंतीत झाले आहेत.

महत्त्वाची बातमी - कमकुवत विद्यार्थ्यांना शिक्षक घेणार दत्तक

रोपे जळाल्याने फेककांद्यावर भर
यंदा कांद्याला 100 रुपयांवर प्रतिकिलो दर मिळाला. त्यामुळे यंदा जिल्ह्यात कांदा लागवड वाढीचा अंदाज होता. मात्र, कांद्याची रोपे खराब झाली. तसेच आता रोप टाकल्यास लागवडीला येण्यास विलंब लागेल. यामुळे कांदा उत्पादक फेककांदा पद्धतीने कांदा उत्पादनाला पसंदी देत आहेत.

अवश्य वाचा - तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात

बिजोत्पादन लागवडीलाही झळ
जे शेतकरी कांद्याचे बीज उत्पादीत करतात. त्या शेतकऱ्यांना नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्याच्या अर्ध्यावरच काद्यांची लागवड करावी लागते. मात्र, यंदा सारखे ढगाळी वातावरण, वातावरणात आर्द्रता व वारंवार धुके पडत आहे. त्यामुळे बिजोत्पानासाठी लावलेल्या कांद्याची पात देखील पिवळू पडून वाळत आहे. परिणामी, बिजोत्पादक शेतकरी चिंतीत झाला आहे.

क्या बात है! - मूर्तिजापूरच्या जया व निकिता बनल्या न्यायाधीश

दरवाढीचा लागवडीवर परिणाम
यांदा कांद्याला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांत चांगला दर मिळाला. मात्र, या कालावधीत शेतकऱ्यांकडे कांदाच राहत नाही. तर खरिपातील नवीन कांदा बाजारात येतो. मात्र, पावसामुळे खरीप कांद्याचे नुकसान झाल्याने दरवाढ झाली. ही दरवाढ पाहता अनेकांनी कांदा लागवडीस प्राधान्य दिले आहे.

जिल्ह्यातील गत रब्बी हंगामातील कांदा लागवड
वाशीम ....50 हेक्टर / रिसोड ...........105 हेक्टर
मालेगाव ..60 हेक्टर / मंगरुळपीर ......30 हेक्टर
कारंजा ....40 हेक्टर / मानोरा ............30 हेक्टर
एकूण ..........................................315 हेक्टर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: onion seedlings destroyed akola marathi news