esakal | पणन महासंघाकडून केंद्र निश्चित, राज्यात ३० ठिकाणी होणार कापूस खरेदी
sakal

बोलून बातमी शोधा

panan mahasangh decide center for cotton selling

शासनाची कापूस खरेदी यंत्रणा म्हणून सीसीआय आणि पणन महासंघाकडे शेतकरी पाहतात. बाजारात भाव नसले तरी या केंद्रावर शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव मिळण्याची शाश्वती असते. यातही यंदा कापसाच्या हमीभावातही वाढ केली आहे.

पणन महासंघाकडून केंद्र निश्चित, राज्यात ३० ठिकाणी होणार कापूस खरेदी

sakal_logo
By
रूपेश खैरी

वर्धा : शेतकऱ्यांचा कापूस घरी आला आहे. यातच सोयाबीन गेल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कापूस विकण्याशिवाय पर्याय नाही. असे असताना अद्याप शासकीय खरेदीचा पत्ता नाही. दसरा उलटल्यानंतर आता कापूस पणन महासंघाची केंद्र निश्‍चित झाली आहेत. पणन महासंघ यंदा राज्यात 30 केंद्रावरून खरेदी करणार असले तरी या खरेदीचा मुहूर्त मात्र दिवाळीनंतरच होणार आहे. 

शासनाची कापूस खरेदी यंत्रणा म्हणून सीसीआय आणि पणन महासंघाकडे शेतकरी पाहतात. बाजारात भाव नसले तरी या केंद्रावर शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव मिळण्याची शाश्वती असते. यातही यंदा कापसाच्या हमीभावातही वाढ केली आहे. यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी साधारणत: दसऱ्याला कापूस खरेदीचा मुहूर्त साधला जातो. यंदा मात्र तसे झाले नाही. शेतकऱ्यांचा कापूस खासगी व्यापारी हमीदरापेक्षा कमी किमतीत खरेदी करीत आहेत. अशावेळी शासनाच्या केंद्राची गरज असताना पणन महासंघाकडून आत्ता केंद्रांची निश्‍चिती करण्यात आली आहे. 

हेही वाचा - गडचिरोलीच्या सुवर्णकन्येने घेतली राज्यपालांची भेट, राजभवनातून आले होते निमंत्रण

पणन महासंघ 30 केंद्रावरून यंदा खरेदी करणार असून त्याचे यथोचित नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात सव्वाकोटी क्‍विंटल कापूस खरेदी करण्याचा मानस पणन महासंघाचा आहे. यात केंद्र जरी कमी असले तरी जिनिंगची संख्या अधिक असल्याचे महासंघाकडून सांगण्यात आले आहे. पणन महसंघाचे केंद्र ठरले असले तरी सीसीआयच केंद्रांचा निर्णय मात्र बाकी आहे. सीसीआयची खरेदी सुरू झाल्यानंतरच या केंद्रांवरून खरेदी सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

अशी आहेत खरेदी केंद्रे - 
पणन महासंघाच्या नागपूर विभागात पुलगाव, काटोल, सावनेर आणि तळेगाव-आष्टी- कारंजा या तीन गावांचे मिळून एक केंद्र करण्यात आले आहे. या तीन ठिकाणी प्रत्येकी दोन दिवस कापूस खरेदी सुरू होणार आहे. वणी विभागात मारेगावसह वरूड-चिमूर, यवतमाळमध्ये यवतमाळसह आर्णी, अकोला विभागात बोरगाव (मंजू)कानशिवणी, कारंजालाड, अमरावती विभागात वरूड, दर्यापूर, मोर्शी, खमगाव येथे जळगाव-शेगाव, देऊळगाव (राजा), औरंगाबाद विभागात बालानगर, सिल्लोड-खामगाव(फाटा), शेगाव-कर्जत, परभणी विभागात गंगाखेड, पाथरी-मोनोट, परळीवैजनाथ विभागात धारूड, केच, मागलगाव, नांदेड विभागात भोकर, तामसा आणि जळगाव येथे पारव्हा, मालेगाव, धामणगाव-कासोद या ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. 

हेही वाचा - दिवसा वनभ्रमंती, रात्रीला मचाणावर जागरण; तेव्हा कुठं पिंजऱ्यात अडकला वाघोबा

केंद्र कमी असले तरी जिनिंगची संख्या अधिक -
पणन महासंघाने आजच केंद्रांची निवड केली. यात सर्वच झोनमिळून 30 केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रांवर सव्वाकोटी क्‍विंटल कापूस खरेदी करण्याचे नियोजन आहे. गेल्यावर्षी पणन महासंघाने 94 लाख क्विंटल कापूस खरेदी केला होता. केंद्र कमी असले तरी जिनिंगची संख्या अधिक आहे. यात एका केंद्रावर दररोज 600 गाठी तयार होतील एवढा कापूस खरेदी करण्याचा प्रयत्न आहे. 
- राजाभाऊ देशमुख, अध्यक्ष, कापूस पणन महासंघ