esakal | रक्तदान करून साजरी केली ईद; गडचिरोली जिल्ह्यातील जामा मशिदीमध्ये शिबिराचे आयोजन 
sakal

बोलून बातमी शोधा

people celebrated Eid by arranging blood donation camp

धानोरा तालुक्‍यातील रांगी येथील सुन्नी रजा जामा मस्जिद येथे ईद - ए - मिलाद या पवित्र सणाच्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात 20 लोकांनी रक्तदान करून रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याचा सामाजिक संदेश दिला

रक्तदान करून साजरी केली ईद; गडचिरोली जिल्ह्यातील जामा मशिदीमध्ये शिबिराचे आयोजन 

sakal_logo
By
भाविकदास कर्मणकर

धानोरा (गडचिरोली) : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सगळ्याच सणांवर निर्बंधाचे सावट असताना येथील मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद या पवित्र सणाला समाजकार्याची सोनेरी किनार देत रक्तदान करून हा सण साजरा केला.

धानोरा तालुक्‍यातील रांगी येथील सुन्नी रजा जामा मस्जिद येथे ईद - ए - मिलाद या पवित्र सणाच्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात 20 लोकांनी रक्तदान करून रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याचा सामाजिक संदेश दिला. याप्रसंगी मौलाना इंतखाफ, बरकत सय्यद, हारिस खान, सोहेल खान, आमिर खान, जावेद सय्यद तसेच सर्व मुस्लिम बांधवांसह भाजप तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे, अरुण चापडे, देवा कुघाडकर, अमित गाईन आदी उपस्थित होते. 

अधिक वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

तसेच रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. किशोर ताराम, रांगी येथील आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोयाम, रक्तसंकलन प्रयोगशाळा तंत्रज्ञ नरेश कंदीकुरीवार, मुरलीधर पेद्दीवार, प्रमोद देशमुख, सूरज चांदेकर यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले. मुस्लिम बांधवांनी या पवित्र सणानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी मुस्लिम बांधवांचे कौतुक केले. 

सध्या कोरोनाची साथ वाढत आहे. त्यामुळे सर्व सणांवर विरजण पडले आहे. नागरिक प्रत्येक सण साध्या पद्धतीने साजरा करत आहेत. म्हणूनच रांगी येथील मुस्लिम बांधवांनी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन कोरोनाच्या नियमांचे पालन करत रक्तदान शिबिर आयोजित करून ईद-ए-मिलाद हा सण साजरा केला. कोरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यात सध्या रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज असताना राबविलेल्या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

कुरखेड्यातही सण साध्या पद्धतीने....

कुरखेडा शहरात जामा मशिद कमिटीच्या वतीने जश्‍ने ईद मिलादुन्नबी हा सण उत्साहात व अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोना संकटामुळे मिरवणूक व जलसा करण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. त्यामुळे यावर्षी शहरात रोषणाई व मिरवणूक काढण्यात आली नाही. मोजक्‍या लोकांच्या उपस्थित मशिदीत कुराण पठण कार्यक्रमानंतर धार्मिक ध्वज कमिटीचे अध्यक्ष अयुब खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

क्लिक करा - जीवलग मित्राने दिला दगा; गर्भवती झाल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी मुजफ्फर बारी, साजिद शेख, राजीक शेख, आसीफ शेख, मकसूद खान, शमीम शेख, रियाज शेख, जमील शेख, बिलाल खाणानी, फैजान शेख, अशपाक खान, वसीम शेख, जम्मू शेख, एजाज शेख, नावेद शेख, फाजील शेख, शहेबाज शेख, शादाब खान आदी उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ