धक्कादायक! प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांचा आरोग्य पथकाला घेराव.. असे काय घडले.. वाचा 

people in containment zone behave badly with health workers
people in containment zone behave badly with health workers

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : ब्रह्मपुरी तालुक्‍यात आतापर्यंत 108 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तालुक्‍यातील मांगली या गावात सर्वाधिक रुग्ण सापडले. या गावाला प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाला पोलिस पाटलांसह गावकऱ्यांनी गावात येणाऱ्या विरोधात केला. याप्रकरणात पोलिस पाटलांसह चाळीस गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.ब्रह्मपुरी तालुक्‍यात कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. 

ग्रामीण भागात मोठया संख्येत रुग्ण सापडले. तालुक्‍यातील मांगली येथे सर्वाधिक 20 कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे या गावाला प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. गावकऱ्यांना घर आणि गावाबाहेर निघण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संपर्कात आलेल्या गावकऱ्यांचे स्वॅब घेण्याचे काम आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू आहे.

गावातील शामलता कार या आशा वर्करने गावातील कारोनाबाधित ग्रामस्थ आणि त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती वैद्यकीय पथकाला दिली. यामुळे गावातील काही महिलांनी कार यांना शिवीगाळ करून वैद्यकीय पथकाला नाव न सांगण्याची ताकीद दिली. माजी पोलिस पाटील यांनी गावातील महिलांना हाताशी घेऊन ग्रामस्थांना हनुमान मंदिरात गोळा केले. यावेळी जवळपास पन्नास महिला आणि पुरुष उपस्थित होते. 

तोंडाला मास्क न लावता, सामाजिक अंतर न पाळता एकत्र जमा झाले. यावेळी घोषणा बाजी केली. वैद्यकीय पथकाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. कर्तव्यावरील पोलिसांनी ग्रामस्थांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी गोंधळ घालीत शिवीगाळ केली. गावकरी प्रचंड संतप्त झाले. तणावाची स्थिती निर्माण झाली. याची माहिती ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात कळताच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी हजर झाला. 

त्यानंतर ग्रामस्थांनी पळ काढला. मांगली प्रतिबंधात्मक क्षेत्र आहे. याठिकाणी मास्क आणि सामाजिक अंतर ठेवले नाही. जिल्ह्यात 144 कलम लागू आहे. या आदेशाचे गावकऱ्यांची उल्लंघन केले. शासकीय कामात व्यत्यय आणणे आणि इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोका पोचविला. या कारणावरून माजी पोलिस पाटलांसह चाळीस जणांवर पोलिसांनी भादंवी 1860 अंतर्गत कलम 186, 188, 269, 270, 271 आणि सहकलम 34 अन्वये गुन्हा दाखल केला.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com