esakal | आता वीजग्राहकांना पाठविता येईल मीटर रिडींग, वाचा नेमकी काय आहे प्रोसेस?
sakal

बोलून बातमी शोधा

Electric-Meter

आता वीजग्राहकांना पाठविता येईल मीटर रिडींग, वाचा नेमकी काय आहे प्रोसेस?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : वीजग्राहकांना स्वतःहून दरमहा मीटर रीडिंग पाठविण्याची सोय व त्यासाठी चार दिवसांची मुदत उपलब्ध आहे. सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू असल्याने संचारबंदी आहे. तसेच अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी महावितरणला मीटर रीडिंग घेणे शक्‍य न झाल्यास वीजग्राहकांना ते पाठविता येईल. महावितरण मोबाईल ऍप किंवा वेबसाईटद्वारे ग्राहकांनी स्वतःहून मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन मुख्य अभियंता अमरावती परिमंडल सुचित्रा गुजर यांनी केले आहे.

हेही वाचा: व्हीआयपींच्या एका फोनवर मिळतो लसीचा डोस; सामान्यांना मात्र बाहेरचा रस्ता; नागपुरातील वास्तव

महावितरणकडून केंद्रीकृत वीजबिलप्रणाली (सेंट्रलाइज बिलिंग सिस्टीम) सुरू करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या एक ते 25 तारखेपर्यंत एका निश्‍चित तारखेला लघुदाब वीजग्राहकांकडील मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रीडिंगसाठी निश्‍चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीजबिलावर नमूद आहे. मीटर क्रमांकदेखील नमूद आहे. रीडिंगच्या या निश्‍चित तारखेच्या एक दिवसाआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविण्याची "एसएमएस'द्वारे दरमहा विनंती करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल ऍप किंवा वेबसाईटद्वारे रीडिंग पाठविता येईल.

हेही वाचा: मित्रच निघाला मास्टरमाईंड, शिक्षकाला लुटणाऱ्या चौघांना अटक

असे पाठविता येणार मीटर रीडिंग -

  • मोबाईल ऍपद्वारे रीडिंग घेण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरण मोबाईल ऍपमध्ये सबमीट मीटर

  • रीडिंगवर क्‍लिक करावे

  • एकापेक्षा जास्त ग्राहक क्रमांक असल्यास ज्या क्रमांकाचे मीटर रीडिंग पाठवायचे आहे तो क्रमांक सिलेक्‍ट करावा. त्यानंतर मीटर क्रमांक नमूद करावा.

  • मीटर रीडिंग घेताना वीजमीटरच्या स्क्रिनवर तारीख व वेळेनंतर रीडिंगची संख्या आणि केडब्लूएच, असे दिसल्यानंतरच (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा.

  • फोटोनुसार मॅन्युअली रीडिंग ऍपमध्ये नमूद करावे व सबमीट करावे.

  • मोबाईल ऍपमध्ये लॉगीन केल्यानंतर मीटर रीडिंग थेट सबमीट करता येईल. मात्र, गेस्ट म्हणून मीटर रीडिंग सबमीट करताना नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल.

  • संकेत स्थळावरून रीडिंग घेण्यासाठी ज्या ग्राहकांना वेबसाईटवरून फोटो व मीटर रीडिंग अपलोड करायचे आहे त्यांनी ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करणे आवश्‍यक आहे.

loading image
go to top