esakal | दिव्यांग दाम्पत्यानी आत्मदहनाचा इशारा देताच पोलिसांची उडाली तारांबळ
sakal

बोलून बातमी शोधा

physically disable couple accused on police in amravati

संदीप यांचे गाडगेनगर हद्दीत सिटीसेंटर येथे आर्यन ऑप्टिकल हे प्रतिष्ठान आहे. शेजारी असलेल्या समव्यावसायिक कुटुंबीयांकडून नेहमीच शिवीगाळ केली जाते, असा आरोप जयस्वाल यांनी केला.

दिव्यांग दाम्पत्यानी आत्मदहनाचा इशारा देताच पोलिसांची उडाली तारांबळ

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : दिव्यांग दाम्पत्याने पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यामुळे शुक्रवारी (ता. 20) पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. दुपारी दोनच्या सुमारास दाम्पत्य दाखल होताच त्यांना फ्रेजरपुरा पोलिसांनी ताब्यात घेऊन आयुक्तांपुढे चर्चेसाठी हजर केले.

हेही वाचा - हे उद्धव ठाकरे नव्हे तर घूमजाव सरकार; भाजपच्या दिग्गज नेत्याने केला आरोप

अंबागेट परिसरातील संदीप शंकरलाल जयस्वाल व हर्षदा संदीप जयस्वाल, असे आत्मदहनाचा इशारा देणाऱ्यांची नावे आहेत. संदीप यांचे गाडगेनगर हद्दीत सिटीसेंटर येथे आर्यन ऑप्टिकल हे प्रतिष्ठान आहे. शेजारी असलेल्या समव्यावसायिक कुटुंबीयांकडून नेहमीच शिवीगाळ केली जाते, असा आरोप जयस्वाल यांनी केला. चार ते पाच जणांनी मिळून आपणास शिवीगाळ व मारहाण केली. त्यासंदर्भात गाडगेनगर ठाण्यात अनेकदा तक्रार दिली होती. तशीच तक्रारी पुन्हा दाखल केली. परंतु, पोलिसांनी अपंग व्यक्तीच्या तक्रारीला गांभीर्याने घेतले नाही, असा आरोप दीपक व हर्षदा जयस्वाल यांनी केला. गाडगेनगर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध अपंग हक्क अधिनियम 2016 च्या कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली नाही. त्यामुळे पोलिस व त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांवर कारवाई व्हावी यासाठी पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता, असे  जयस्वाल यांनी तक्रारीत सांगितले. 

हेही वाचा - आपण विसरतोय पण 'त्यांना' आहे आठवण; परप्रांतीय जपताहेत दिवाळीतील किल्ल्यांची परंपरा  

दुपारी दोनच्या सुमारास सदर दाम्पत्य आयुक्तालयासमोर येताच त्यांच्याभोवती फ्रेजरपुरा पोलिसांनी गराडा घालून दोघांनाही पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्यापुढे हजर केले. दोषींविरुद्ध कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर जयस्वाल दाम्पत्याने आत्मदहन मागे घेतले. 

संबंधितांच्या पहिल्या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. आता नव्याने दुसरी तक्रार नोंदविण्यात आली. संबंधितांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात नव्याने गुन्हा दाखल केला जाईल.
- मोहन कदम, प्रभारी पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे.