प्लास्टिक उद्योग संकटात, कच्च्या मालावर दुपटीपेक्षा जास्त सीमा शुल्क

रूपेश खैरी
Wednesday, 9 December 2020

प्लास्टिक उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर सीमा शुल्क दुपटीपेक्षा जास्त वाढविले आहे. तसेच देशात तयार होणाऱ्या कच्चा मालाला निर्मितीची परवानगी दिल्याने विदर्भातील प्लास्टिक उद्योग संकटात सापडले आहेत.

वर्धा : विविध कामांसाठी प्लास्टिकपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु, प्लास्टिक उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर सीमा शुल्क दुपटीपेक्षा जास्त वाढविले आहे. तसेच देशात तयार होणाऱ्या कच्च्या मालाला निर्मितीची परवानगी दिल्याने विदर्भातील प्लास्टिक उद्योग संकटात सापडले असून अनेकांचा रोजगारसुद्धा जाऊ शकतो. याकडे केंद्र सरकारने तत्काळ लक्ष देऊन प्लास्टिक उद्योगांना संरक्षण द्यावे, अशी मागणी वर्धा एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन केली आहे.

हेही वाचा -  'ते' पाच सेकंद आणि तब्बल ११९ जणांचा दुर्दैवी अंत...

प्लास्टिक उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर सीमा शुल्क दुपटीपेक्षा जास्त वाढविले आहे. तसेच देशात तयार होणाऱ्या कच्चा मालाला निर्मितीची परवानगी दिल्याने विदर्भातील प्लास्टिक उद्योग संकटात सापडले आहेत. पाणीपुरवठा आणि इतर शासकीय योजनांसाठी लागणाऱ्या पीव्हीसी पाइपचा शासकीय दर 850 रुपये आहे. त्याच दराने पुरवठादाराने पुरवठा केला पाहिजे. त्याचे उत्पादन शुल्क सध्या 1250 रुपये पडत आहे. त्यामुळे बऱ्याचशा पाणीपुरवठा योजनेचे काम ठप्प आहे. 

हेही वाचा - अनेकांचे घराचे स्वप्न भंगले : बांधकाम क्षेत्राला...

देशात 10 ते 12 कंपन्या प्लास्टिकसाठी लागणारा कच्चा माल तयार करतात. देशभरात 50 लाखाहून अधिक कामगार व कर्मचारी प्लास्टिक इंडस्ट्रीजमध्ये काम करीत आहेत. परंतु, गत पाच महिन्यांपासून होणाऱ्या कच्च्या मालाच्या भाववाढीमुळे व विदेशातून येणाऱ्या कच्च्या मालावर सरकारने भरमसाट आयात शुक्‍ल वाढविल्यामुळे भाव वाढले आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय तज्ज्ञांची समिती नेमनू कच्च्या मालाची होत असलेली निर्यात तत्काळ थांबवून कच्चा मालाचे दर नियंत्रणात आणावे. तसेच आयात शुक्‍ल कमी करून उद्योगाला कच्चा माल उपलब्ध करून दिल्यास देशातील कितीतरी उद्योग बंद पडून लाखो लोकांचे रोजगार जाऊ शकतात. त्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ प्लास्टिक उद्योगांना संरक्षण द्यावे, अशी मागणी वर्धा एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवून केली आहे. 

हेही वाचा -  खुशखबर! नागपूरकरांची कोरोनाची भीती होणार दूर, उपराजधानीत लवकरच लसीकरण

अनेक उद्योग बंद -
कच्च्या मालाच्या भाववाढीमुळे मागणी कमी झाली आहे. परिणामी, कितीतरी उद्योग 50 टक्केपेक्षा कमी क्षमतेने सुरू आहे. तर काही उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे अनेकांचा रोजगार जाऊ शकतो. पीव्हीसी पाइप तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर मे व जून महिन्यात 90 रुपये किलो होते. त्याचा दर आता 160 रुपये प्रतिकिलो आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: plastic industries faced problems in wardha