पुल होणार बंद...तळीरामांची पंचाईत

संदीप रायपुरे /निलेश झाडे
Thursday, 13 February 2020

महाराष्ट्र तेलंगणा या दोन राज्यांना जोडणारा पोडसा पूल तयार करण्यात आला. मात्र पहिल्याच महापूराने पुलाचा एक स्लॅब क्षतिग्रस्त झाला होता. गेल्या अनेक वर्षापासून याच स्थितीत पूलावरून वाहतूक सुरू होती. पुलावरून जडवाहतूक होऊ नये यासाठी प्रशासनाने वारंवार दोन्ही बाजुंना उभ्या भिंती तयार केल्या. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.

गोंडपिपरी : महाराष्ट्र तेलंगणा राज्यांना जोडणा-या पोडसा पुलावरील रहदारी दोन महिन्याकरिता बंद करण्याबाबत प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. पुलाचा काही भाग क्षतिग्रस्त झाला होता. यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा - आरोपी विकेश म्हणाला, मला गोळ्या झाडून मारा...
महाराष्ट्र तेलंगणा या दोन राज्यांना जोडणारा पोडसा पूल तयार करण्यात आला. मात्र पहिल्याच महापूराने पुलाचा एक स्लॅब क्षतिग्रस्त झाला होता. गेल्या अनेक वर्षापासून याच स्थितीत पूलावरून वाहतूक सुरू होती. पुलावरून जडवाहतूक होऊ नये यासाठी प्रशासनाने वारंवार दोन्ही बाजुंना उभ्या भिंती तयार केल्या. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. अशात क्षतिग्रस्त झालेल्या पुलाचा एक स्लॅब पुन्हा वाकला. यामुळे तो कोसळण्याची शक्‍यता आहे. यामुळे प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता रमेश शंभरकर यांनी चंद्रपूर व तेलंगणातील आसिफाबाद जिल्हयातील जिल्हाधिका-यांना पुलाच्या स्थितीबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या निर्णयानंतर या मार्गावरील वाहतुक पुलाचे काम होईपर्यत बंद ठेवण्यात येणार आहे. पुलाच्या एका स्लॅबची दुरूस्ती करावयाची आहे. त्यासाठी प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. नागरिकांना होणारा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला.
तळीरामांची पंचाईत
चंद्रपूरात दारूबंदी झाल्यांनतर गोंडपिपरी तालुक्‍यातील तळीरामांना तेलंगणातील शिरपूरचा मोठा आधार ठरला होता. पोडसा पूल ओलांडल्यानंतर तीन किलोमीटर अंतरावरील वाईन शॉपीच्या माध्यमातून तळीराम मद्य प्राशन करीत होते.आता मात्र पुलावरील रहदारी थांबणार असल्याने तळरामांची चांगलीच पंचाईत होणार आहे.
तेलंगणातील प्रवाशांनाही फटका
तेलंगणातील लगतच्या भागातून अहेरी व परिसरातील येणा-या प्रवाश्‍यांची संख्या झपाट्याने वाढली होती. पोडसा पूल त्यांच्याकरिता कमी अंतराचा ठरला होता. आता रहदारीच बंद होणार असल्याने त्यांनाही याचा फटका बसेल.

रहदारी बंद करण्याचा निर्णय

तेलंगणा महाराष्ट्राला जोडणारा पोडसा पूलाचा एक स्लॅब क्षतिग्रस्त झाला होता.त्याची दुरूस्ती करण्याबाबत प्रशासनाचे नियोजन सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून हा मार्गावरील रहदारी लवकरच बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे
रमेश शंभरकर,
उपविभागीय अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Podasa bridge is out of order for two months