कोंढाण्यात पोलिस आणि नागरिकांच्या सहकार्याचे अनोखे दर्शन; मानवी साखळीने विझवली आग 

संदीप रायपुरे 
Friday, 20 November 2020

अग्नीशामक वाहनाची वाट बघणे शक्य नव्हते.यामुळे पोलिस आणि गावकऱ्यांनी गावाच्या तलावापासून तर घटनास्थळापर्यत मानवी साखळी तयार केली.आणि यातून आग विझविली

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर):-  गावातील एका शेतक-याच्या पुंजण्याला वेडसर महिलेने आग लावली.अन क्षणार्धात आगीचा भडका उडाला.क्षणभरात हि माहिती गावभर पसरली.पेट्रोलिंगवर असलेल्या पोलीसांना आगीचा बातमी समजली.अन ते काही वेळात घटनास्थळी पोहोचले.

अग्नीशामक वाहनाची वाट बघणे शक्य नव्हते.यामुळे पोलिस आणि गावकऱ्यांनी गावाच्या तलावापासून तर घटनास्थळापर्यत मानवी साखळी तयार केली.आणि यातून आग विझविली.आज सकाळच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्यातील कोंढाणा शेतशिवारात हा प्रसंग बघावयास मिळाला.

जाणून घ्या - दुर्दैवी! शेतात कामासाठी गेला शेतकरी; सापाने तब्बल तीन वेळा दंश केल्याने गेला जीव

धाब्यालगत कोढांणा येथील राजु येनमपल्लीवार यांची दिड एकर शेती आहे.या शेतात धानकापणी केल्यांनतर त्यांनी शेतातच धानाचे पुंजणे ठेवले.आज सकाळी नउ वाजताच्या सुमारास एका वेडसर महिलेने त्यांच्या पंुजण्याला आग लावली.आगीचा भडका उडाल्याने गावकऱ्यांनी धावाधाव केली.

धाब्याचे ठाणेदार सुशिल धोपटे हे आपल्या सहकार्यासह पेट्रोलिंगवर असतांना त्यांनी घटनेची माहिती मिळाली.त्यांनी लगेच घटनास्थळ गाठल.यावेळी त्यांची चमु व गावातील नागरिकांनी एक साखळी तयार केली.या माध्यमातून तलावाच्या पाण्याने आग विझविण्यात आली.

यात येनमपल्लीवार यांचा ढिगारा जळून खाक झाला.मात्र लगतच्या शेतकऱ्यांना ढिगारा वाचविण्यात यश आले.गोंडपिपरीचे तहसिलदार के.डी.मेश्राम यांनी घटनास्थळी भेट दिली.पोलीस व नागरिकंाच्या सहकार्याने पुढील अनर्थ टळल्याने तहसिलदार मेश्राम यांनी पोलीस व नागरिकांच्या भुमिकेचे कौतूक केले.महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

पेट्रोलिंगवर असतांना कोंढाण्यात धानपुंजणाला आग लागल्याची माहिती मिळाली.यानंतर आम्ही तातडीन घटनास्थळी पोहचला.अग्नीशामक वाहनाला विलंब असल्याने आम्ही नागरिकांच्या मदतीने साखळी तयार केली वच आग विझविली.
  सुशिल धोपटे,
ठाणेदार धाबा

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police and people controlled fire by making human chain