डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या शवविच्छेदन अहवालावर पोलिसांचे मौन; आमटे परिवारातील सदस्यांचे घेतले बयाण 

प्रमोद काकडे
Thursday, 3 December 2020

रासायनिक पृथक्करण अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करता येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या आत्महत्येच्या अनुषंगाने आनंदवन आणि आमटे परिवारातील सदस्यांचे बयाण नोंदविण्यात आले आहे.

चंद्रपूर : महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येमुळे सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आत्महत्येमागील कारण काय हे अद्याप कोणालाही कळू शकले नाही. शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. 

रासायनिक पृथक्करण अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करता येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या आत्महत्येच्या अनुषंगाने आनंदवन आणि आमटे परिवारातील सदस्यांचे बयाण नोंदविण्यात आले आहे. आणखी काही लोकांची चौकशी होईल, असे सांगितले जात आहे. 

अधिक वाचा - विवाहिता प्रसूतीसाठी माहेरी आली अन् दीड महिन्याच्या चिमुकल्याला गमावून बसली; भर दुपारी अपहरण

आनंदवनातील राहत्या घरी ३० नोव्हेंबरला डॉ. शीतल यांनी विषारी इंजेक्‍शन घेऊन आत्महत्या केली. हायफ्रोफाईल प्रकरण असल्याने त्यांचे शवविच्छेदन चार तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या निगराणीखाली करण्यात आले. त्याचा अहवाल पोलिसांना काल बुधवारी देण्यात आला आहे. परंतु पोलिसांनी त्यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर यावर भाष्य करणे अधिक सोयीचे होईल, अशी पोलिसांनी भूमिका आहे. 

दरम्यान या आत्महत्येनंतर आमटे परिवार आणि आनंदवनातील काही कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविण्यात आले आहे. डॉ. शीतल यांचा लॅपटॉप, टॅब आणि मोबाईल नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाने ताब्यात घेतले आहे. ते मुंबईतील आयटी तज्ज्ञांकडे पाठविले आहे. 

हेही वाचा - बंगल्यामागे आढळली मानवी मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

डॉ. शीतल यांनी त्या वापर असलेल्या गॅजेटचे पासवर्ड काही दिवसांपूर्वीच बदलले होते. याची माहिती त्यांचे पती गौतम करजगी यांना नव्हती. काही गॅजेटमध्ये त्यांनी आपले डोळे पासवर्ड ठेवले आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या आहे. डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्याच आहे, या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहचले आहे. परंतु अधिकृत भाष्य करण्यास त्यांच्याकडून नकार देण्यात येत आहे.

संपादन- अथर्व महांकाळ  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police are still quite about postmortem report of doctor shital amte