पोलिसांनी दिले ३० गायींना जीवनदान; अवैधरित्या जनावरे घेऊन जाणारा ट्रक केला जप्त 

प्रतीक मकेश्वर 
Thursday, 15 October 2020

तिवसा राष्ट्रीय महामार्गावरून दिवस-रात्र अवैधरित्या जनावरांना ट्रंकमध्ये कोंबून वाहतूक केली जाते, रोज या मार्गावरून शेकडो ट्रकमधून कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक होत असते.

तिवसा (जि. अमरावती) : तिवसा वाहतूक पोलिसांनी अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करत जप्तीची कारवाई केली असून यामध्ये 31 गायीचा समावेश आहे.  एका गायीचा मृत्यू झाला तर इतर जनावरांना केकतपूरच्या गोरक्षणामध्ये सोडण्यात आले. ट्रक  तिवसा पोलिसांनी केला. यावेळी घटनास्थळावरून एकजण फरार होण्यात यशस्वी झाला तर ट्रक चालकावर पुढील कारवाई पोलिस करत आहे.

तिवसा राष्ट्रीय महामार्गावरून दिवस-रात्र अवैधरित्या जनावरांना ट्रंकमध्ये कोंबून वाहतूक केली जाते, रोज या मार्गावरून शेकडो ट्रकमधून कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक होत असते.

ठळक बातमी - ‘ये लाईफ मैं डिझर्व्ह नही करता’, असे चिठ्ठीत लिहून पुण्यातील अभियंत्याची आत्महत्या

आज शहराच्या पेट्रोल पंप चौकात दुपारच्या वेळेला गस्तीवर असलेल्या वाहतूक पोलिसांना एमएच, 40.बीएल 4989 क्रमांकाच्या ट्रकमध्ये जनावरे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी केली मात्र सुसाट धावणाऱ्या ट्रक चालकाने नाकाबंदी तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

यावेळी गस्तीवर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचारी सतीश चंदन, व विशाल सूर्यवंशी यांनी दुचाकीने ट्रकचा पाठलाग करत मोझरी याठिकाणी ट्रक जप्त करत कारवाई केली यामध्ये एकजण घटनास्थळावरून फरार झाला असून ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले या कारवाईमध्ये 30 गायींना जीवनदान मिळाले.

क्लिक करा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

यात एका गायीचा गुदमरून मृत्यू झाला तर इतर जनावरांना केकतपूरच्या गोरक्षणामध्ये सोडण्यात आले आहे.  ही कारवाई  पोलिस निरीक्षक रिता उईके यांच्या मार्गदर्शनात एच.सी बानूकोडे, सतीश चंदन, विशाल सूर्यवंशी यांनी केली असून ट्रक चालकावर अवैध जनावर वाहतुकी कायद्या अंतर्गत पुढील कारवाई तिवसा पोलिस करत आहेत. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrested smugglers of pet animals from Amravati district