esakal | पिंपरी जंगलातील जुगारावर पोलिसांचा छापा; सहा जण ताब्याततर सात फरार
sakal

बोलून बातमी शोधा

Police caught illegal Gambling unit in Pimpri yavatmal

यवतमाळ ग्रामीणचे प्रभारी ठाणेदार गजानन करेवाड यांना पिंपरी जंगल शिवारात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा टाकला असता, एका निंबाच्या झाडाखाली तीन पत्ती नावाचा जुगार सुरू होता.

पिंपरी जंगलातील जुगारावर पोलिसांचा छापा; सहा जण ताब्याततर सात फरार

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ: जुगार अड्ड्‌यावर छापा टाकून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी 11 दुचाकींसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सात जुगारी फरार झाले असून, त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. ही कारवाई यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी (ता.9) पिंपरी जंगलात केली.

जाणून घ्या -  'तिच्या' घरी सुरु होती लग्नाची लगबग पाहुणेही होते तयार; तेवढ्यात आला फोन अन् एका क्षणात सगळंच संपलं 

अंकुश संतोषराव कांबडी (23, रा. घुईखेड, जि. अमरावती), मंगेश सखाराम गावंडे (27), रजनिकांत दिलीप खाडे (31, दोघेही रा. बोथ, ता. दारव्हा), नौशाद शेख निजाम शेख (18, रा. हनुमाननगर, नेर), नितीन शंकर खडसे (26, रा. अण्णा भाऊ साठे चौक, नेर), मोहसिन खान, नजीर खान (27, रा. वाणीपूरा, नेर) अशी अटकेतील जुगारींची नावे आहेत.

यवतमाळ ग्रामीणचे प्रभारी ठाणेदार गजानन करेवाड यांना पिंपरी जंगल शिवारात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा टाकला असता, एका निंबाच्या झाडाखाली तीन पत्ती नावाचा जुगार सुरू होता. छापा पडताच काही जुगारी दुचाकी सोडून पळून गेले. तीन जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व पळून गेलेल्या तीन जुगाऱ्यांचा पाठलाग करून त्यांनाही अटक केली. 

अधिक वाचा - एकाचवेळी पाच बालकांना हातात घेऊन शूर परिचारिकेची आगीतून धाव, मेयोमधील घटनेची अनेकांना आठवण

त्यांच्याकडून अंगझडतीत 17 हजार 340 रुपये व चार लाख 55 हजारांच्या 11 दुचाकी जप्त केल्या. सात जण पसार झाले असून, एकूण 13 जणांविरुद्घ जुगार कायद्याअंतर्गत ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार गजानन करेवाड, सहायक पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग कवरासे, ज्ञानेश्वर मातकर, संजय राठोड, चव्हाण, सुरेश डाखोरे आदींनी केली. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

loading image