esakal | पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, यवतमाळ पोलिस मुख्यालयात होती नेमणूक
sakal

बोलून बातमी शोधा

police committed to suicide in yavatmal

किशोर फकरूजी मोरे (वय 35, रा. पळसवाडी पोलिस क्वॉर्टर, यवतमाळ), असे मृताचे नाव आहे. हा कर्मचारी पोलिस मुख्यालयात नेमणुकीस होता. शनिवारी घरातून दुर्गंधी येत असल्याने ही घटना उघडकीस आली.

पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, यवतमाळ पोलिस मुख्यालयात होती नेमणूक

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : येथील पोलिस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने क्वॉटरमध्ये आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता.14) सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली.

हेही वाचा - भाऊबीजेच्याच दिवशी भावाला अखेरचा निरोप, हुतात्मा जवान भूषण सतईंच्या बहिणीचा टाहो

किशोर फकरूजी मोरे (वय 35, रा. पळसवाडी पोलिस क्वॉर्टर, यवतमाळ), असे मृताचे नाव आहे. हा कर्मचारी पोलिस मुख्यालयात नेमणुकीस होता. शनिवारी घरातून दुर्गंधी येत असल्याने ही घटना उघडकीस आली. यवतमाळ शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवाळीच्या दिवशी पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - दुर्दैवी वास्तव! शेतकऱ्यांचा माल सडतोय धुळीत; व्यापारी माल भरून करताहेत मजा 

संशयास्पद अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह, घातपाताचा संशय -

तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी (ता.15) सकाळी साडेअकराच्या सुमारास  शहरातील नेताजीनगरातील स्वस्तधान्य दुकानासमोर उघडकीस आली.

हेही वाचा - 'एम्स’मध्ये सुरू झाले हृदयावर उपचार; तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती

गोपाल सुदाम हातागडे (वय 28, रा. नेताजीनगर, यवतमाळ) , असे मृताचे नाव आहे. हा तरुण मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होता. दिवाळीच्या दिवशी दुपारी घरून निघून केला. सायंकाळी घरी परत आला. घरी फटाके फोडून बाहेर निघून गेला. रात्री उशिरापर्यंत परत आला नाही. दरम्यान, आज रविवारी व्ही. के. अग्रवाल यांच्या स्वस्तधान्य दुकानासमोर त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर घाव असल्याने नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वृत्तलिहेस्तोवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.