कोरोना व्हायरस : बिनकामाने फिरणाऱ्या 40 नागरिकांना पोलिसांनी दिली ही शिक्षा

चांदूररेल्वे : युवकांकडून माहिती घेताना पोलिस.
चांदूररेल्वे : युवकांकडून माहिती घेताना पोलिस.

चांदूररेल्वे (जि. अमरावती) : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरातील नागरिक संचारबंदीचे सारे नियम धाब्यावर बसवून अतिशय बेशिस्तीने वागत असल्याचे लक्षात येत होते. रविवारी भरलेला आठवडी बाजार हे त्याचेच उदाहरण होते. वृत्तपत्रातून आणि सोशल मीडियातून प्रशासनावर टीका झाल्याने बुधवारी प्रशासन चांगलेच कार्यान्वित झाल्याचे पाहायला मिळाले.

ठाणेदार वानखडे यांनी चौकात व रस्त्यांनी फिरताना दिसणाऱ्या अनेक नागरिकांना थांबवून कारण विचारले. अनेकजण सहज म्हणून फिरताना आढळून आले. त्यावरून त्यांच्यावर कारवाई करीत त्यांना पोलिस ठाण्यात एक तास बसवून ठेवण्यात आले.

नऊ सेल्समनला वसतिगृहात क्वारंटाइन

बडनेरा येथील एका खासगी कंपनीत सेल्समनचे काम करणारे 9 सेल्समन कंपनी बंद झाल्याने पायीच आपल्या चंद्रपूर या भागातील गावाकडे जात असल्याचे पोलिसांना समजले. त्यावरून तहसीलदार श्री. इंगळे यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना स्थानिक मुलांच्या वसतिगृहात क्वारंटाइन करून ठेवले.
तसेच स्थानिक पत्रकारांच्या मदतीने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.

कोरोनाचे कुठलेही गांभीर्य नाही

शहरात अनेक अपरिचित लोक फिरताना दिसत आहेत, तर गावातील नागरिकही एकाच दुकानावर गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे स्थानिक जुना बसस्टॅण्ड चौकात सकाळी गर्दी पाहायला मिळते. शहरातही गल्लीबोळांत अनेक लोक ग्रुप करून बसल्याचे पाहायला मिळते. यावरून त्यांना कोरोनाचे कुठलेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. नगरपरिषद, पोलिस ठाणे व तहसील कार्यालय यांनी गांभीर्याने घेतले तर शहरात कोरोनाचा शिरकाव होणार नाही, हे सत्य असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com