अमरावती शिक्षक मतदारसंघ : रिंगणात राजकीय पक्षाचे उमेदवार, निवडणूक अटीतटीची?

सुरेंद्र चापोरकर
Sunday, 8 November 2020

राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवाराच्या नावाच्या घोषणेची केवळ औपचारिकता आता शिल्लक आहे.  मंगळवारी ही घोषणा होईल, तर दोन दिवसांत भाजपसुद्धा आपला उमेदवार जाहीर करेल, असे मानले जात आहे.

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदा रसंघाच्या निवडणुकीने आता जोर धरला असून पहिल्या तीन दिवसांतच तब्बल ३४ जणांनी अर्जांची उचल करण्यात आली आहे. प्रत्यक्षात रिंगणात राहणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढण्याचे संकेत आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या या निवडणुकीत राजकीय पक्षाचे उमेदवार रिंगणात येणार असल्याने ही निवडणूक अधिकच काट्याची होण्याचे संकेत आहेत. 

राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवाराच्या नावाच्या घोषणेची केवळ औपचारिकता आता शिल्लक आहे.  मंगळवारी ही घोषणा होईल, तर दोन दिवसांत भाजपसुद्धा आपला उमेदवार जाहीर करेल, असे मानले जात आहे. हे उमेदवार पक्षांचे असले तरी त्यांना पक्षाचे चिन्ह राहणार नाही, असे सध्यातरी सांगितले जात आहे. शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत आतापर्यंत शिक्षक संघटनांचाच  दबदबा राहिला आहे. काही संघटना राजकीय पक्षाशी संबंधित असल्या तरी प्रत्यक्षात राज्य किंवा केंद्रातील नेतृत्वाच्या जोरावर उमेदवारी दिली जात नव्हती. संबंधित संघटनेच्या माध्यमातूनच उमेदवार निश्चित करण्यात येत होते. परंतु, यावेळी पहिल्यांदाच राजकीय पक्ष प्रत्यक्षात उमेदवार निश्चित करीत आहेत. 

हेही वाचा - Success story : सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडला उद्योगाचा मार्ग, आता महिन्याला...

पाच नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज उचलण्याची प्रक्रिया सुरू झाली असून गेल्या तीन दिवसांत तब्बल ३४ जणांनी अर्ज घेतले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस १२ नोव्हेंबर असल्याने दिवाळीच्या आधीच ही प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, रिंगणात असलेल्या उमेदवारांचे चित्र १७ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अर्ज उचलणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी प्रत्यक्षात रिंगणात कोण राहते? हे १७ नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे. हा मतदारसंघ प्रचंड मोठा असल्याने सर्वच उमेदवारांचा चांगलाच कस लागणार आहे. त्यामुळे आपल्या संघटनेच्या माध्यमातून जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. 

हेही वाचा - खुशखबर! दिवाळीपूर्वी ४९ हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत

डिजिटल प्रचाराचा जोर -
सर्वच संभाव्य उमेदवारांनी गेल्या दोन महिन्यांपासूनच डिजिटल पद्धतीने शिक्षकांशी संपर्क सुरू ठेवला आहे. कारण मतदारसंघाचा व्याप प्रचंड मोठा असल्याने सातत्याने शिक्षकांशी प्रत्यक्ष संपर्क करणे शक्य नसल्याने सर्वांनीच समाजमाध्यमांचा वापर केला आहे. त्यासाठी संबंधित उमेदवारांच्या कार्यालयात विशेष यंत्रणासुद्धा कार्यान्वित करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political party candidate may contest teacher constituency election in amravati