पाच दिवसांआधी सात महिन्याच्या बाळाचा मृत्यू आता वैद्यकीय अधिकारी असलेल्या मातेने गमावला जीव

सुधीर भारती
Monday, 21 September 2020

रुग्णालयात सेवा देत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर अमरावती व नंतर नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. पाच दिवसांपूर्वी त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता, हे विशेष...

अमरावती : कोरोनाच्या काळात अनेक धक्कादायक प्रकार समोर येत असताना मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. एका गर्भवती डॉक्टर महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे या महिला डॉक्टर सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. पाच दिवस आधीच त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महिलेचाही मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मृत डॉक्टर महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात पॅथॉलॉजी विभागात कार्यरत होत्या. रुग्णालयात सेवा देत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना अमरावती व नंतर नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान नागपूरच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. एका युवा डॉक्टरचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

क्लिक करा - शाळा प्रवेशाचे वय शिथिल; राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काढला आदेश, असे आहेत बदल

रुग्णसेवा देताना कोरोनाची लागण

अमरावती इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पॅथॉलॉजी विभागात कार्यरत युवा गर्भवती डॉक्टर महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्या पॅथॉलॉजी विभागात कार्यरत होत्या. त्या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. रुग्णालयात सेवा देत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर अमरावती व नंतर नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. पाच दिवसांपूर्वी त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता, हे विशेष...

रुग्ण बरे होण्याचा विक्रम

राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशात आरोग्य सेवेच्या तुडवड्यामुळे रुग्णांचा नाहक बळी जात आहे. राज्यात रविवारी कोविड रुग्ण बरे होण्याचा विक्रम झाला.

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला

डॉक्टरला कोरोनाची लागण
सदर महिला डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
- डॉ. श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pregnant woman dies in Amravati