
उदासीन वैद्यकीय यंत्रणेचा दुसरा बळी; आठ महिन्यांच्या गरोदर महिलेचा मृत्यू
हिंगणघाट (जि. वर्धा) : तालुक्यातील (Hinganghat) वासी येथील गरोदर महिलेला वेळीत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. रूपाली लहू पर्बत (वय 20) असे मृत महिलेचे नाव आहे. यापूर्वी सावंगी झाडे येथे मायलेकी तीन दिवस घरी मृताअवस्थेत पडून होत्या. प्रशासकीय वैद्यकीय अवस्थेच्या (Heath Administration) ढिसाळ कारभारामुळे पुन्हा ही दुसरी घटना घडली आहे. (Pregnant woman is no more due to ignorance of heath administration)
हेही वाचा: कोरोनाची लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे का? जाणून घ्या डॉक्टरांचं मत
वासी येथे राहणारी रूपाली लहू पर्बत या 8 महिन्याच्या गरोदर विवाहित महिलेला पोटात दुखत असल्या कारणाने अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे आणले. त्यावेळी उपस्थित डॉक्टरांनी रुग्णालयात कोविड रुग्ण असल्याने गायनिक वॉर्ड बंद असल्याचे सांगून खासगी रुग्णालयात जाण्यास सांगितले.
दरम्यान, खासगी रुग्णालयांत गेल्यानंतर त्यांना सेवाग्राम येथे जाण्याचा खासगी डॉक्टरांनी सल्ला दिला. म्हणून पुन्हा रूपालीला उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. तेव्हा तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी अर्धा तास थांबायला सांगितले, दरम्यान ती बेशुद्ध पडली. ताबडतोब वैद्यकीय उपचार न मिळाल्याने सदर महिलेचा मृत्यू झाला. सदर विवाहित महिलेचे गतवर्षी लग्न झाले होते. आठव्या महिन्यांपर्यतचा तिचा उपचार प्राथमिक आरोग्य केंद्र वासी येथे सुरू होता.
9 महिना सुरू होणार आहे. सोनोग्राफी करून घ्या, या सूचनेनुसार हिंगणघाट येथे माहेरी पोहोचवण्यात आले. घरी तिची प्रकृती अस्वस्थ झाल्याने तिला दवाखान्यात आणले होते. गरोदर महिलेचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणावरून झाला हे मात्र समजू शकले नाही.
सोमवारला शवविच्छेदन केल्यावर महिलेचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. योग्य उपचार मिळाला असता तर तिचे व बाळाचे प्राण वाचविता आले असते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांनी वाशी येथे जाऊन सदर महिलेच्या सासरी भेट दिली. यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील डॉक्टरांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की कोरोना मुळे दवाखान्यातील इतर ओपीडी बंद करण्यात आलेल्या आहे.
हेही वाचा: International Nurses Day : रुग्णांची अविरत सेवा करूनही तुटपुंजा पगार; परिचारिकांची व्यथा
त्यामुळे इतर आजाराचे पेन्शट घेणे बंद आहे. असा निर्णय कोणाच्या परवानगीने घेतला, हे मात्र कळू शकले नाही. या सर्व अव्यवस्थेचा हा दुसरा बळी आहे. याअगोदर सावंगी झाडे येथे तीन दिवस मरून राहिलेल्या मायलेकी. ही दुसरी घटना आहे.
(Pregnant woman is no more due to ignorance of heath administration)
Web Title: Pregnant Woman Is No More Due To Ignorance Of Heath
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..