esakal | गावपातळीवर ‘प्रायमरी रेस्क्यू टीम’; वन्यप्राण्यांपासून सुरक्षेसाठी ग्रामस्थांना प्रशिक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

गावपातळीवर ‘प्रायमरी रेस्क्यू टीम’; ग्रामस्थांना प्रशिक्षण

गावपातळीवर ‘प्रायमरी रेस्क्यू टीम’; ग्रामस्थांना प्रशिक्षण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जंगल क्षेत्रालगत असलेल्या गावांसह शेतशिवारात वन्यप्राण्यांकडून शेतकरी, मजुरांवर हल्ले होतात. असे हल्ले रोखण्यासाठी गावपातळीवर ‘प्रायमरी रेस्क्यू टीम’ गठित करून प्रशिक्षण देण्याचे नियोजन विभागाने केले आहे. (Primary-rescue-team-Wildlife-protection-Training-to-the-villagers-Yavatmal-District-News-nad86)

यवतमाळ जिल्हा मौल्यवान वनसंपदेने नटला आहे. जंगलासह वन्यप्राण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. पांढरकवडा तालुक्यात येणाऱ्या टिपेश्‍वर अभयारण्यासह इतरही भागात वाघांसह अस्वल, रानडुक्कर, नीलगाय आदी वन्यप्राणी आहेत. हे वन्यप्राणी सुरक्षित अधिवासाच्या शोधात जंगलातून बाहेर पडतात आणि गाव, शेतशिवारात शिरतात. त्यामुळे वन्यप्राणी व मानवांचा संघर्ष शिगेला पोहोचतो. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलातील पानवठ्यावर पाणी मिळत नसल्याने वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात.

हेही वाचा: हवामान तज्ज्ञांनी पावसाबाबत दिले संकेत; चिंता वाढणार की कमी होणार?

अनेकदा वन्यप्राणी महामार्गावरही दिसून पडतात. अशावेळी शिकारी शिकार करून आपला हेतू साध्य करतात. राळेगाव तालुक्यात अवनी वाघिणीने तीन वर्षांपूर्वी केलेल्या हल्ल्यात तेरा जणांचा बळी गेला. तर नुकताच झरी तालुक्यातील पिवरडोल येथील युवकाचा वाघाने बळी घेतला. पशुधनावरही नेहमीच हल्ले होतात.

अशा घटनांना आळा घालण्याची आग्रही मागणी जनतेकडून केली जात आहे. त्यामुळे गावपातळीवर रेस्क्यू टीम गठित करून त्यांना वन्यप्राण्यांपासून कसे संरक्षण करावे, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे वनालगत असलेल्या गावातील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

वनालगत असलेल्या गावांत लवकरच रेस्क्यू टीमची स्थापना करण्यात येणार आहे. गावकऱ्यांचे संरक्षण करता यावे म्हणून वनविभागाकडून प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
- प्रकाश लोणकर, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), यवतमाळ

(Primary-rescue-team-Wildlife-protection-Training-to-the-villagers-Yavatmal-District-News-nad86)

loading image