मोबाईल अ‌ॅपसाठी पालकांकडून आकारले जातात पैसे, अ‌ॅप न घेतल्यास अध्यापनास नकार

सुधीर भारती
Thursday, 19 November 2020

शहरातील काही खासगी शाळांनी मोबाईल अ‌ॅप उपलब्ध करून देण्यासाठी खासगी संस्थांना परवानगी दिल्याची माहिती आहे. सदर कंपन्यांकडून ऑनलाइन अ‌ॅपसाठी पालकांकडून दरमहा 400 ते 500 रुपये शुल्क आकारले जात आहे.

अमरावती : विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अध्यापन कार्यात मदत म्हणून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत काही खासगी कंपन्यांनी पालकांकडून शुल्क वसुली सुरू केली आहे. खासगी शाळांनी सुद्धा या कंपन्यांना मोकळीक दिल्याने पालकांची मात्र पिळवणूक होत असल्याची ओरड सुरू झाली आहे. 

हेही वाचा - फक्त दोन बोटांनी उचलता येणारी हलकी सायकल, पण किंमतीला...

शहरातील काही खासगी शाळांनी मोबाईल अ‌ॅप उपलब्ध करून देण्यासाठी खासगी संस्थांना परवानगी दिल्याची माहिती आहे. सदर कंपन्यांकडून ऑनलाइन अ‌ॅपसाठी पालकांकडून दरमहा 400 ते 500 रुपये शुल्क आकारले जात आहे. हे अ‌ॅप न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन करण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे पालक मात्र चांगलेच संतापले आहे. अ‌ॅपचे शुल्क न भरणाऱ्यांची नावे ग्रुपवर सुद्धा देण्यात येत असल्याने पालकांना चांगलाच मनःस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे अ‌ॅपचा वापर न करणाऱ्यांना सुद्धा संबंधित  कंपनीकडून मेसेज दिला जात असल्याची पालकांची तक्रार आहे.   

हेही वाचा - आयुर्वेदिक औषधांना सुवर्णकाळ; प्रतिकारशक्ती...

शाळांनी भरावे शुल्क -
खासगी कंपनीशी हातमिळवणी करणाऱ्या शाळांनी विद्यार्थ्यांचे हे शुल्क भरावयास हवे. पालकांवर त्याचा आर्थिक भार येता कामा नये, असे एका पालकाने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले. 

हेही वाचा - विदेशातील गुंतवणूक भोवली, राष्ट्रवादीचा बावनकुळेंवर...

अ‌ॅपच्या माध्यमातून एखादी शाळा पालकांकडून पैसे घेत असेल तर ते गंभीर आहे. पालकांनी सुद्धा शाळेविरोधात तक्रार दिली तर संबंधित शाळेला नोटीस देण्यात येईल.
- एजाज खान, शिक्षणाधिकारी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: private companies demand money to parents for mobile app in amravati