Pune Air India Employee Murder
esakal
Pune Air Hostess Case: वैनगंगा नदीकाठच्या जंगल परिसरात एका महिलेची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोंडराणी (अर्जुनी) येथील श्रीराम देवस्थान परिसरात शनिवारी (ता. १४) सायंकाळी ही घटना घडली. तीन अज्ञात हल्लेखोरांनी महिलेसोबत असलेल्या व्यक्तीला लुटले, तर महिलेवर धारदार चाकूने वार केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वर्षा धुरनलाल तुरकर (वय ३५, रा. धानोरी, पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या मूळच्या किन्ही नवेगाव (ता. वाराशिवनी) येथील रहिवासी होत्या. एअर इंडियामध्ये ऑपरेटर म्हणून त्या काम करीत होत्या.