मेडीकल कॉलेजमधील रॅगींग भोवले 

Ragging at Medical College
Ragging at Medical College

अकोला: मेडिकल कॉलेजमधील प्रसुती व स्त्री रोग शास्त्र विभागातील परप्रांतीय मुलींच्या बहुचर्चित रॅगिंग प्रकरणी गुरुवारी (ता.12) अ‍ॅन्टी रॅगिंग समितीची अंतिम बैठक झाली. या बैठकीच्या अहवालानुसार तक्रारकर्त्या विद्यार्थिनीला कामातून त्रास झाल्याबद्दल तिन्ही दोषी विद्यार्थिनींना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड करण्याची शिफारस समितीने केली. 

या प्रकरणात तिला भविष्यात संबंधितांडून कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची सूचनाही करण्यात आली.

उच्चस्तरीय समितीने चौकशी अहवाल वैद्यकीय संचालकांकडे सादर केल्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या अ‍ॅन्टी रॅगिंग समितीच्या बैठकीत तिन्ही विद्यार्थिनींना रॅगिंग प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर झालेल्या चौकशीच्या आधारे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी गुरुवार, 12 डिसेंबर रोजी अ‍ॅन्टी रॅगिंग समितीच्या बैठकीत अंतिम अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारावर तिन्ही वरिष्ठ विद्यार्थिनींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय, यानंतर पीडित विद्यार्थिनीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असाही समज देण्यात आला. अ‍ॅन्टी रॅगिंग समितीच्या बैठकीला उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक तुषार नेवारे, सुधाकर खुमकर, जुगल चिराणीया, डॉ. गजानन आत्राम, सचिन गाडगे, रमेश पवार, डॉ. अपर्णा वाहने, गजानन काळे आदिंची उपस्थिती होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com