esakal | पूर्णा घाटात चालतो हा व्यवसाय; म्हणून आता या तस्करांविरोधात सुरू झाली मोहीम
sakal

बोलून बातमी शोधा

sand mafia in buldana.jpg

सध्या महसूल प्रशासनाच्या भोवती कोरोना विषयक लढ्याची जबाबदारी असून तलाठ्यांचे भोवती नवीन पीक कर्जाची सुद्धा जबाबदारी आहे.

पूर्णा घाटात चालतो हा व्यवसाय; म्हणून आता या तस्करांविरोधात सुरू झाली मोहीम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव (जा.) (जि.बुलडाणा) : जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे आदेशान्वये ठाणेदार सुनील जाधव यांनी पूर्णा घाटात विविध ठिकाणी छापे टाकून आठशे ब्रासहुन अधिक रेती साठा जप्त केल्याने महसूल विभाग सुद्धा खळबळून जागा झाला.

लॉकडाउनच्या काळामध्ये विविध वाहनांवर कारवाई करून तहसीलदार डॉ. शिवाजीनगर यांनी नऊ लाख 75 हजार 200 रुपये एवढी दंडात्मक कारवाई केली आणि 20 मे पासून सर्व मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना सूचना देऊन पूर्णा नदीपात्रातील व परिसरातील सर्व अवैध रेती साठा जप्त करण्याचे आदेश दिले. याचाच एक भाग म्हणून 20 मे रोजी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी गोळेगाव, माऊली शिवारात 800 ब्रास पेक्षा अधिक रेती साठी जप्त केला असून 21 मे रोजी सुद्धा ही कारवाई सुरू होती. या दिवशीसुद्धा पूर्णा नदी परिसरात या ठिकाणी रेती साठे जप्त केले.

आवश्यक वाचा - अरे वा! गावाच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत

सध्या महसूल प्रशासनाच्या भोवती कोरोना विषयक लढ्याची जबाबदारी असून तलाठ्यांचे भोवती नवीन पीक कर्जाची सुद्धा जबाबदारी आहे. महसूल विभाग व पोलीस विभाग कोरोना विरुद्धच्या लढयात आपली सेवा समर्पित करीत असून ते कोरोना विषयक कारवाईत गुंतले असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेत तालुका आणि परिसरातील रेती वाहक वाहनधारकांनी दिवसाची रात्र करून पूर्णा नदीतील वाळू उपशाचे एकमेव काम हाती घेतले. 

दररोज विना रॉयल्टी हजारो ब्रास रेती हे वाहन चालक उपसत आहेत. परंतु ही फसवणूक जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जळगाव (जा)चे ठाणेदार पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांना आदेश देऊन रेतीतस्करांविरुद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. त्याचाच एक भाग म्हणून ठाणेदार व त्यांचे सहकाऱ्यांनी एकाच दिवशी 750 ब्रास रेतीसाठा जप्त करून पुढील कारवाईसाठी ती महसूल विभागाच्या ताब्यात दिली.

हेही वाचा - Video : तुम्हाला माहिती आहे आयपीएल प्लेअर काय करतोय अकोल्यात?, रणजी आणि अंडर 19 चे खेळाडूंचा जाणून घ्या
दिनक्रम


तहसीलदार डॉ. शिवाजीराव मगर यांचे मार्गदर्शनाय गोळेगाव बु. आणि झाडेगाव शिवारात पण 18 मे रोजी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी आठशे ब्रास रेतीसाठा जप्त केला असून 19 मे रोजी दादूलगाव व हिंगणा बाळापूरला 390 ब्रास तर सातळी परिसरात 148 ब्रास रेतीसाठा महसूल विभागाने जप्त करून स्थानिक पोलीस पाटलांच्या ताब्यात दिला.

तोपर्यंत कार्यवाही सुरूच राहणार
जोपर्यंत सर्व अवैध रेतीसाठे जप्त होत नाहीत तोपर्यंत कार्यवाही सुरूच राहणार असून, कामात दिरंगाई करणाऱ्या महसूल कर्मचारी, तलाठी यांचेवर सुद्धा कार्यवाही करण्यात येईल.
- डॉ.शिवाजीराव मगर, तहसीलदार, जळगाव (जा).

loading image