esakal | रेल्वेतील गर्दी देतेय धोक्याचा संकेत; विनामास्क दाटीवाटीने प्रवास झाला सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेतील गर्दी देतेय धोक्याचा संकेत; विनामास्क दाटीवाटीने प्रवास झाला सुरू

रेल्वेतील गर्दी देतेय धोक्याचा संकेत; विनामास्क दाटीवाटीने प्रवास झाला सुरू

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर : कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याचा इशारा दिला जात असला तरी रेल्वे प्रवासी मात्र निश्चिन्त असल्याचे दिसते. रेल्वेगाड्या खचाखच भरून धावत आहेत. त्यात प्रवाशांच्या चेहऱ्यावर मास्क सुद्धा दिसत नाही. रेल्वेतील ही गर्दी धोक्याचे संकेत देणारी आहे. (Railway-station-Crowds-of-citizens-Coronavirus-Travel-without-mask-nad86)

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून जनजीवन पूर्वपदावर परतत आहे. रेल्वे गाड्यांमधील गर्दीसुद्धा चांगलीच वाढली आहे. अनेक गाड्यांमधील जनरल डब्यात तर पाय ठेवायलाही जागा नसते. सुरक्षित अंतराचे पालन करणे दूरच सीटवर दाटीवाटीने प्रवासी बसतात. त्यानंतरही जागा पुरत नसल्याने अगदी दोन्ही टोकांना असणाऱ्या शौचालयांपर्यंत प्रवाशांची खचाखच गर्दी असते.

हेही वाचा: थक्क करणारा प्रवास! ८० रुपये ते दोन कोटींचा मालक व चार उद्योग

गाडीत बसताना नाका, तोंडावर असलेला मास्क काही वेळातच आपोआप निघून जातो. स्लिपर कोचमध्येही अशीच गर्दी दिसते. काही गाड्यांच्या तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्यांमध्येही चांगलीच गर्दी दिसून येते बरेचदा प्रवासी दारापर्यंतही उभे असतात. धडकी भरविणारे हे चित्र जवळपास सर्वच प्रवासी रेल्वेगाड्यांमध्ये कमी अधिक अंतराने दिसते.

मुंबई आणि हावडा मार्गावरील गाड्यांमध्ये सर्वाधिक गर्दी दिसत आहे. रेल्वेच्या नियमित गाड्या बंद असून मर्यादित विशेष ट्रेन तेवढ्या धावत आहेत. पर्याय नसल्याने धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. अलीकडेच नागपूरहून रवाना झालेल्या एका गाडीत अफाट गर्दी असल्याने चांगलीच चर्चा झाली. प्रशासनाने धावपळ करीत प्रवाशांना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याची सूचना केली. पण, गर्दी काही केल्या कमी होऊ शकली नाही. काही वेळानंतर डब्यातील स्थिती जैसे थे झाली. या प्रकाराला आळा घालणार तरी कोण, असा प्रश्न प्रवासी करीत आहेत.

हेही वाचा: उजळले भाग्य! बंदूक सोडली, पुस्तकं वाचली, झाली मॅट्रिक पास

गर्दी येते कुठून?

कन्फर्म तिकीट असल्याशिवाय रेल्वेत प्रवेश देण्यात येत नाही. जनरल डब्याचे तिकीटही मोजक्याच प्रवाशांना मिळते. अशा स्थितीत प्रवासी येतात तरी कुठून असा प्रश्न प्रवासी करीत आहेत. नागपूर विभागातून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये तपासणी करूनच प्रवाशांना सोडले जाते. गर्दी होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. बाहेरून येणाऱ्या गाड्यांबाबत मात्र आपल्याला काही सांगता येत नसल्याचे नागपूर विभागाचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव यांनी सांगितले.

(Railway-station-Crowds-of-citizens-Coronavirus-Travel-without-mask-nad86)

loading image