esakal | राजुरा: गोवरी वासियांनी पुन्हा कोळसा वाहतूक रोखली
sakal

बोलून बातमी शोधा

राजुरा: गोवरी वासियांनी पुन्हा कोळसा वाहतूक रोखली

राजुरा: गोवरी वासियांनी पुन्हा कोळसा वाहतूक रोखली

sakal_logo
By
टीम ई सकाळ

राजुरा: बल्लारपूर वेकोली अंतर्गत गोवरी डीप कोळसा खदानतून होणारी अवजड वाहतूक थांबवण्यासाठी नागरिकांनी 2 सप्टेंबर रोजी चक्काजाम आंदोलन केला. तब्बल सहा तास वाहतूक ठप्प झाली होती. वेकोलिचे अधिकारी यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले.

हेही वाचा: गळ्यातील फासासह वाघिणीची भ्रमंती; फासामुळे मानेवर गंभीर जखम

मात्र, दोन दिवसातच पुन्हा ओवरलोड वाहतुकीमुळे धुळीचा त्रास सुरू झाल्याने आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चक्काजाम आंदोलन केले. वेकोली अधिकाऱ्याने आश्वासन न पाळल्यामुळे भास्कर जूनघरी यांच्या नेतृत्वातील गावकऱ्यांनी चक्काजाम केले. हे आंदोलन संध्याकाळीही सुरू होते.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या चक्काजाम आंदोलनात वेकोलीच्या गोवरी डीप कोळसा खाण व्यवस्थापनाने गोवरी मुख्य मार्गावर रस्त्यावर पाणी मारण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र दोन दिवसापासून टँकरने पाणी मारणे बंद आहे. त्यामुळे रविवारी सायं.६ वाजता गोवरी वासियांनी पुन्हा वेकोलीची कोळसा वाहतूक रोखून धरली. गौरी पवनी साखरी मार्गावर प्रचंड प्रमाणात ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरू असते.

हेही वाचा: अमरावती : पुसला गावात वाघाचे दर्शन; रोहीची शिकार

यामुळे रस्त्याचे तीन-तेरा वाजलेले आहेत. प्रचंड महाकाय खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. या मार्गावरील नाल्यावर बांधण्यात आलेले पूलही धोकादायक स्थितीत आहेत. याकडेही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे कोळसा वाहतूक ओव्हरलोड असल्यामुळे या मार्गावर धुळीचे साम्राज्य वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला त्रास होत आहे. ताडपत्री न झाकता वाहतूक सुरू असल्यामुळे धावत्या वाहनातून कोळशाचे तुकडे रस्त्यावर पडतात त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका आहे.

दिनांक 2 सप्टेंबर रोजी झालेल्या आंदोलनात वेकोलिचे अधिकारी यांनी नागरिकांच्या मागण्यांची पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र दोन दिवसातच आश्वासन विसरल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आणि चक्काजाम आंदोलन केले.वेकोलीने या मार्गावरील चालणाऱ्या वाहतुकीबाबत दिलेले आश्वासन पाळले नाही तर कोळसा वाहतूक होऊ दिली जाणार नाही असा इशारा भास्कर जुनघरी यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना दिलेला आहे.

loading image
go to top