कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज, चाचण्यांमध्येही वाढ

ready for corona second wave in amravati
ready for corona second wave in amravati

अमरावती : युरोप तसेच नवी दिल्लीत सुरू झालेली कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात सुद्धा येण्याची भीती आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यास धावपळ होऊ नये यासाठी जिल्हाप्रशासन पूर्णपणे 'अलर्ट' असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून टेस्टिंग वाढविण्यात आल्या असून बेडस्‌च्या उपलब्धतेवर सुद्धा काम केले जात आहे. 

कोरोनाच्या 'पीक पिरियड'मध्ये जिल्ह्यात जवळपास 3 हजारावर रुग्णसंख्या होती. तशीच परिस्थिती दुसऱ्या लाटेत ग्राह्य धरल्यास बेड्‌स तसेच ऑक्‍सिजन बेड्‌सची उपलब्धता कशी, यावर प्रशासन काम करीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शहर तसेच जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटर अद्यापही सुरूच असून कोविड केअर सेंटरलासुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत. 

ग्रामस्तरावर चाचणीचे प्रयत्न -
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुद्धा सोयीच्या उपलब्धतेनुसार कोविड चाचणी केंद्र सुरू करण्यात येतील. ग्रामीण भागातील रुग्णांची चाचणी वेळेवर व्हावी, या उद्देशाने हा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

मृत्यूदर राज्यात सर्वांत कमी -
कोरोनाच्या चढत्या काळात अमरावतीमध्ये होणाऱ्या मृत्यूची संख्या विभागात तसेच राज्यात अव्वल स्थानी राहिली होती. मात्र, आता त्यामध्ये आश्‍चर्यकारक उतार पाहायला मिळत आहे. अमरावतीचा मृत्यूदर सध्या 2 टक्‍यांपेक्षाही कमी म्हणजे 1.97 इतका असल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला. बरे होणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा चांगले आहे. 

ऑक्‍सिजन पुरवठा -
गंभीर तसेच अतिगंभीर रुग्णांना ऑक्‍सिजनची कमतरता भासू नये, यासाठी आधीपासूनच 250 सिलिंडर राखीव ठेवण्यात आले आहे. याशिवाय सुपर स्पेशलिटीमध्ये ऑक्‍सिजन टँकमधून पुरवठा केला जाईल, तसेच पीडीएमसीमधील ऑक्‍सिजन टॅंकचे काम सुद्धा आता अंतिम टप्प्यात आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com