आम्हाला इतर कुठे नाही तर घरीच पाठवा; दाम्पत्याचा आयसोलेशन वॉर्डात धिंगाणा

रूपेश खैरी
Saturday, 11 July 2020

दाम्पत्याला समजविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य आशिकारी डॉ. अजय डवले, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांनी रुग्णालय गाठले. परंतु, हे दाम्पत्य ऐकण्यास तयार नसल्याने सामान्य रुग्णालायात बराच काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

वर्धा : हाय रिक्‍स भागातून आयसोलेशन वॉर्डात आणण्यात आलेल्या दाम्पत्याला विलगीकरणात ठेवण्यासाठी सेवाग्राम येथील यात्री निवासात पाठविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. परंतु, या दाम्पत्याने "आम्हाला इतर कुठे नाही तर घरीच पाठवा' असे म्हणून शुक्रावारी (ता. 10) रात्रीच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयातीळ आयसोलेशन वॉर्डात ठिय्या मांडला. यानंतर पुढील घटनाक्रम घडला... 

महिला गर्भवती असल्याने त्यांना उत्तम सुविधा असलेल्या सेवग्राम येथील यात्री निवासात जाण्याचा सला देण्यात आला होता. एवढेच नाही तर त्यांना निवडण्यात आलेल्या काही हॉटेलात जाण्याचे सांगण्यात आले. मात्र, हे दाम्पत्य कुणाचेही ऐकण्यास तयार नसल्याने साऱ्याची पंचाईत झाली. दाम्पत्याकडून आम्हाला घरीच जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. परंतु, हे दाम्पत्य हाय रिस्क भागातून आल्याने त्यांना घरी पाठविणे धोक्‍याचे आल्याने आरोग्य विभाग त्याला नकार देत असल्याचे चित्र रात्री उशिरापर्यंत कायम होते.

हेही वाचा - बीफार्म पदवीधर युवकाने केली कोरफडीची शेती अन् झाला लघुउद्योगाचा मालक...बेरोजगारांना दिला रोजगार

दाम्पत्याला समजविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य आशिकारी डॉ. अजय डवले, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांनी रुग्णालय गाठले. परंतु, हे दाम्पत्य ऐकण्यास तयार नसल्याने सामान्य रुग्णालायात बराच काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यात अधिकारी घरी पण पोलिसांची मात्र येथे ड्युटी लागल्याने पंचाईत झाली.

अधिकारी घरी, पोलिस रुग्णालयात

दाम्पत्याला समजावून सर्वच अधिकारी थकले. यानंतर त्यांनी घराचा रस्ता धरला. पण, पोलिस प्रशासन मात्र सुरक्षेच्या दृष्टीने येथे कायम होते. यामुळे दाम्पत्याच्या अडचणींवर मार्ग काढावा अशी मागणी त्यांच्याकडून होत होती.

अधिक माहितीसाठी - महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

अखेर गाठले यात्री निवास

या दाम्पत्याने चांगलाच धिंगाणा घातला. यामुळे सर्वांची पंचाईत झाली. अधिकारी त्यांना समजावून थकले. मात्र, ते कुणाचे काहीही ऐकण्यास तयार होते. अथक प्रयत्नानंतर ते तयार झाले. शेवटी त्यांना सेवाग्राम येथील यात्री निवासात पाठविण्यात आले आणि नाट्यमय घडामोटींवर पर्दा पडला. 

कुणाचेच ऐकण्यास तयार नव्हते 
आयसोलेशन वॉर्डात असलेले दाम्पत्य हाय रिस्क एरियातून आलेले आहे. महिला गर्भवती असल्याने तिच्या सुरक्षेसाठी सेवग्राम येथील विलगीकरण केंद्रात पाठविण्याचा निर्णय घेतला. पण, ते आम्ही कुठेही जाण्यास तयार नाही, आम्हाला घरी पाठवा असे म्हणत कुणाचेच ऐकण्यास तयार नव्हते. यामुळे अडचण निर्माण झाली होती. 
- पुरुषोत्तम मडावी, 
जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Refusal to enter the couple's separation room at Wardha