esakal | खामगाव पंचायत समिती सभापतीपदी रेखा मोरे यांची निवड निश्‍चित
sakal

बोलून बातमी शोधा

Rekha More will chair of the Khamgaon panchayat committee

खामगाव बाजार समितीमध्ये एकूण 14 सदस्य आहेत. त्यापैकी भाजपाकडे 10 तर काँग्रेसचे 4 सदस्य आहेत. यापूर्वी सभापतीपदी भाजपाच्या उर्मिला गायकी यांना संधी देण्यात आली होती. त्यांचा अडीच वर्षे संपल्यानंतर विधानसभा निवडणूक लागल्याने त्यांना सहा महीने मुदतवाढ मिळाली. आता नवी आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे. त्यानुसार खामगाव बाजार समितीचे सभापती पद मागासवर्गीय महिला राखीव निघाले आहे आता या पदासाठी पक्षाकडून रेखा मोरे यांनाच संधी मिळणार आहे. 

खामगाव पंचायत समिती सभापतीपदी रेखा मोरे यांची निवड निश्‍चित

sakal_logo
By
श्रीधर ढगे

खामगाव (जिल्हा बुलडाणा) :  खामगाव पंचायत समिती सभापती
पदाचे आरक्षण मागासवर्गीय महिला राखीव निघाले आहे. त्यामुळे आता सभापतीपदी भाजपाच्या एकमेव मागासवर्गीय महिला सदस्य रेखा युवराज मोरे यांची वर्णी लागणार आहे. 

खामगाव बाजार समितीमध्ये एकूण 14 सदस्य आहेत. त्यापैकी भाजपाकडे 10 तर काँग्रेसचे 4 सदस्य आहेत. यापूर्वी सभापतीपदी भाजपाच्या उर्मिला गायकी यांना संधी देण्यात आली होती. त्यांचा अडीच वर्षे संपल्यानंतर विधानसभा निवडणूक लागल्याने त्यांना सहा महीने मुदतवाढ मिळाली. आता नवी आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे. त्यानुसार खामगाव बाजार समितीचे सभापती पद मागासवर्गीय महिला राखीव निघाले आहे आता या पदासाठी पक्षाकडून रेखा मोरे यांनाच संधी मिळणार आहे. 
खामगाव मतदार संघात सर्व जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे आहेत तर 10 पंचायत समिती सदस्य सुद्धा भाजपा कडे आहेत. रेखा युवराज मोरे एकमेव मागासवर्गीय सदस्य भाजपच्या असल्याने  सभापतीपदासाठी  पक्षाकडून यांचे नाव निश्चित झाले आहे.

हेही वाचा - महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारूंचे सरकार
 
पुन्हा महिलाराज
खामगाव पंचायत समिती सभापती पदी पुन्हा महिला विराजमान होणार आहेत. यापूर्वी उर्मिला शरदचंद्र गायकी सभापती होत्या. आता पुन्हा सभापती पदाचे आरक्षण मागासवर्गीय महिला राखीव निघाल्याने सभापतीपदी रेखा मोरे यांच्या  निवड होवून त्यांच्या रूपाने पंचायत समितीत महिलाराज येणार आहे.

अधिक माहितीसाठी - बाजार समिती सभापतींसह संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार 

उपसभापती पदासाठी चुरस
 खामगाव पंचायत समितीमध्ये भगवानसिंग सोळुंके हे उपसभापती होते. सर्वाधिक सदस्य भाजपाचकडे असल्याने उपसभापती पदासाठी यावेळी यावेळी चुरस पहायला मिळणार आहे. पक्षाकडून कोणाला संधी मिळते हे लवकरच कळेल