कोरोना काळात लग्नासाठी डिजिटल पर्याय, व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून नातेवाईक घेताहेत लग्नाचा आनंद

marriage
marriagee sakal

गडचांदूर(चंद्रपूर) : विवाह (marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आहे. हा क्षण आठवणीचा ठरावा आप्तस्वकीयांची उपस्थिती रहावे यांची प्रत्येकजण अपेक्षा करीत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विवाह सोहळ्याला 25 वऱ्हाडयांच्या उपस्थिती आणि अवघ्या दोन तासाचा अवधी असे निर्बंध घातले. त्यामुळे अनेकांची इच्छा असूनही विवाह सोहळ्यात सहभागी होऊ शकत नाही. मात्र, आता अनेकांना शासनाच्या नियमाचे पालन करीत त्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी डिजिटल पर्याय (digital option) शोधून काढला आहे. त्यामुळे व्हाट्सअप व्हिडीओ कॉलिंग च्या माध्यमातून अनेक जण विवाह सोहळ्यात सहभागी होत आहे. (relatives attend marriage ceremony thorugh video calling in gadchandur of chandrapur)

marriage
भाग्यश्रीचं वारली पेंटिंगमधून रामायण दर्शन पोहोचलं मुख्यमंत्र्यांपर्यंत; दिली कौतुकाची थाप

तालुक्यातील खैरगाव येथील पांगुर आणि सुमठाणा येथील घोरुडे परिवाराची 9 मे रोजी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. शासनाच्या नियमाचे पालन करीत केवळ पंचवीस वऱ्हाडयाच्या उपस्थिती विवाह सोहळा करण्यात आला आणि पांगुर आणि घोरुडे यांनी या आनंदाच्या क्षणात आपल्या नातेवाईकांना सहभागी करून घेण्यासाठी डिजिटल पर्याय निवडला यावेळी व्हाट्सअप व्हिडीओ कॉलिंग च्या माध्यमातून अनेक नातेवाइकांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिला. गावखेड्यात वापरण्यात आलेल्या या डिजिटल पर्यायाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

आंतरजिल्हा परप्रांतातील नातेवाईक आनंदी -

कोरोनाचा प्रतिबंधासाठी राज्य संचारबंदी लागू आहे. त्यामुळे आंतरजिल्हा किंवा परप्रांतात जाण्यासाठी पास बंधनकारक करण्यात आले आहे. अशातही खासगी बससेवा बंद असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. या काळात आपल्या नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहता येत नसल्याचे अनेकांना दुःख आहे. परंतु, आता व्हाट्सअप व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून आंतरजिल्हा परप्रांतातील नातेवाईक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन वधू-वरास आशीर्वाद देत आहे.

विवाहाची तारीख निश्चित केली. नातेवाईकाकडे पत्रिका वितरित केली. त्यावेळी राज्यात संचारबंदी नव्हती. मात्र, नंतरच्या काळात काही दिवसांनी राज्यात कोरोनाचा प्रतिबंधासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. यावेळी आंतरजिल्हा परप्रांतातील नातेवाईक विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्याबाबत अडचण निर्माण झाली. मात्र, व्हाट्सअप व्हिडीओ कॉलिंगच्या या डिजिटल पर्यायातून अनेक जण विवाह सोहळ्यात सहभागी होऊ शकले याचा आनंद आहे.
- अतुल पांगुर, नवरदेव खैरगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com