‘महावितरणमुळे राष्ट्रउभारणीत योगदान देण्याची संधी’

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 January 2020

मुख्य अभियंता तथा अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या हस्ते प्राविण्य प्राप्त तेवीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा धनादेश व पुष्प देऊन गौरविण्यात आले.

अकोला : महावितरणने आपल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रउभारणीत योगदान देण्याची संधी दिली असल्याने, अकोला परिमंडळातील महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या वीज ग्राहकांना दर्जेदार, सुरक्षित, तत्पर आणि अखंडित सेवा देऊन राष्ट्र विकासाला अधिक गती देण्यासाठी काम करावे असे आवाहन मुख्य अभियंता अनिल डोये यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिलेल्या संदेशात केले.

विद्युत भवन अकोला येथे 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता अनिल डोये यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता तथा अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या हस्ते प्राविण्य प्राप्त तेवीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा धनादेश व पुष्प देऊन गौरविण्यात आले.

महत्त्वाची बातमी - युवक काँग्रेसचे सुपर 60 च्या धर्तीवर आता सुपर 1000

क्रीडा स्पर्धेत पदक प्राप्त विजेत्यांचा सत्कार
नागपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाची मानकरी ठरलेली सहाय्यक अभियंता कोमल पुरोहीत तसेच रजत पदक प्राप्त शरद भोसले, तंत्रज्ञ किशोर धाबेकर, निम्नस्तर लिपिक हसुन्न्नोदिन शेख, शिपाई शुभम मात्रे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन वरिष्ठ व्यवस्थापक शिवाजी तिकांडे यांनी केले.

आवश्यक वाचा - बच्चू कडू इन ॲक्शन, अधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका

या मान्यवरांची उपस्थिती
प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमाला कार्यकारी अभियंते प्रदीप पुनसे, प्रशांत दाणी, गजेंद्र गडेकर, प्रणाली विश्लेषक राजेश दाभने, उपमुख्य औधोगिक संबंध अधिकारी विशाल पिपरेसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: republic day celebration in mahavitaran office