
मतमोजणीची. त्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
अमरावती ः जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.15) मतदान शांततेत पार पडले. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती सोमवारी होणाऱ्या मतमोजणीची. त्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार
अमरावती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी विलासनगरच्या शासकीय धान्य गोदामात होणार आहे. अचलपूरची मोजणी परतवाडा मार्गावरील कल्याण मंडपम् , चांदूर बाजार, दर्यापूर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, वरुड व अंजनगाव सुर्जी या तालुक्यांची मोजणी संबंधित तहसील कार्यालय परिसरात, धारणी तालुक्याची मोजणी कुसुमकोट बु. येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात होईल.
चिखलदराची गणना नगर परिषद गेस्ट हाऊस परिसर, मोर्शीची मोजणी शिवाजी उच्च माध्यमिक शाळा परिसर, नांदगाव खंडेश्वरची मोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तिवसा तालुक्याची मतमोजणी तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात, भातकुलीची मोजणी अमरावती शहरातील चपराशीपुरा स्थित पालिकेच्या उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. 13 मध्ये होईल.
नक्की वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली
मतमोजणीच्या ठिकाणी व मतमोजणी वेळी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे क्षुल्लक कारणांवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन मतमोजणीच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्हादंडाधिकारी शैलेश नवाल यांनी मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात 18 जानेवारीच्या सकाळी 8 वाजतापासून ते मतमोजणी संपेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
संपादन - अथर्व महांकाळ