rohit powar.
rohit powar.

रोहित पवार म्हणतात, तर त्याला घराणेशाही म्हणता येणार नाही

बुलडाणा :  एखाद्या नेत्याच्या मुलाला संधी मिळत असेल तर त्याची पहिली संधी ही घराणेशाहीमुळे असेलही. परंतु, त्यानंतर त्यांच्यामध्ये क्षमता आहे की, नाही हे पाहून जर जनता त्याला पुन्हा निवडून देत असेल तर त्याला घराणेशाही म्हणता येणार नाही. घराणेशाहीच्या नावाखाली त्याच्यावर अन्याय करता येणार नाही. असे घराणेशाही बाबत आमदार रोहित पवार म्हणाले. 

महत्त्वाची बातमी - आधी शिक्षकाला केली नागरिकांनी मारहाण; नंतर कळाले हा तर गैरसमज
शिक्षणाचा दिला सल्ला

कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर त्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचेच आहे. राजकारणात युवकांनी येण्याबद्दल दुमत नाही. मात्र, शिक्षणालाही तेवढेच महत्त्व द्या आणि समाजकारणाचा उद्देश डोक्यात ठेवून राजकारणात या. धाडस करा, यश तुमचेच आहे. असा सल्ला कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार तथा पवार घराण्याचे वारसदार रोहित पवार यांनी बुलडाण्यातील युवकांना दिला.


क्लिक करा - कारवाई प्रस्तावित असलेल्या मंडळ अधिकाऱ्याची बदली
विद्यार्थ्यांनी मांडले अनेक प्रश्‍न 

येथील जिजामाता महाविद्यालयाच्या प्रांगणात राजर्षी शाहू फाउंडेशनच्या वतीने संदीप शेळके यांनी आयोजित केलेल्या युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी युवकांनी विचारलेल्या शेकडो प्रश्‍नांना पवार यांनी दिलखुलास उत्तरे दिली. बुलडाण्यातील युवकांचा मला अभिमान वाटतो. कारण त्यांनी विचारलेले सर्व प्रश्न हे त्यांच्या भवितव्याशी निगडित आहेत. राजकारणापेक्षा युवा पिढीला आपल्या भवितव्याची चिंता जास्त आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी मुलींच्या सामाजिक समस्या, व्यवसाय, शेतकरी कर्जमाफी, महापोर्टल, स्पर्धा परीक्षा संदर्भात येणाऱ्या अडचणी, अर्थकारण, शेतीविषयक विविध समस्या, कर्जमाफी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींच्या काळात करावयाची मदत, महाराष्ट्रातील उद्योगधंद्या समोर येणाऱ्या अडचणी, लघु व्यावसायिकांचे प्रश्न, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न, बुलडाणा जिल्ह्यात रखडलेला रेल्वेमार्ग, वैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय आदी विविध प्रश्न विचारून युवा आमदाराला बोलते केले.


मागील सरकारपेक्षा हे सरकार वेगळ्या विचाराचे
या सर्व प्रश्नांवर पवार यांनी दिलखुलासपणे उत्तरे देऊन आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर धाडसाने पुढे या. मेहनत करा. जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर यश तुम्हाला निश्‍चित मिळेल, असा सल्ला दिला. मराठी माणूस धाडस करायला मागेपुढे पाहतो. पारंपरिक पद्धतीने वागतो. त्यामुळे मागे राहतो. जगाच्या ट्रेंड लक्षात घ्या. आज सुरू असणारे अनेक उद्योग-व्यवसाय काळाच्या कसोटीवर उद्या टिकणार नाहीत. त्याची माहिती घ्या. मोबाईल आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग जीवघेणे गेम खेळण्यापेक्षा जगाचा ट्रेंड माहीत करून घेण्यासाठी करा आणि स्वतःचे भविष्य उज्वल करा, हे सरकार मागील काळातील सरकारपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करणारे सरकार आहे. धार्मिक जातीय तेढ निर्माण करण्याऐवजी, आपल्याला कोणते सामाजिक प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न हाताळता येतील लोकांच्या हाताला काम कसे देता येईल, या पद्धतीने सरकार विचार करत आहे.

दिवसभर चालली चर्चा
हे सांगतानाच पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कशा पद्धतीने अनेक संधी असताना केवळ कृषिमंत्री पद स्वीकारले, शेतकऱ्यांच्या हिताचे किती निर्णय घेतले, त्यामुळे आज कोणता लाभ होत आहे, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविकातून शेळके यांनी सुरवातीलाच या कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट करून सामाजिक जाणिवेतून आपण जिल्ह्यातील युवा पिढी जे प्रश्न सुटावेत त्यांना नव्या काळातील आव्हाने समजावेत त्यादृष्टीने प्रयत्न करता यावेत म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या सदस्य अ‍ॅड. जयश्रीताई शेळके, नंदिनी टारपे, भाऊसाहेब शेळके, सुनील सपकाळ, मालती शेळके, यांच्यासह शैक्षणिक सामाजिक सहकार व राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी उपस्थित होते. जिजामाता महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो युवक-युवतींनी उपस्थिती लावल्याने या कार्यक्रमाची दिवसभर चर्चा होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com