esakal | साकोलीचे पालटणार रूपडे, तलाव सौंदर्यीकरणासह बगीचा-बोटिंगची व्यवस्था
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

साकोली शहरातील तलाव कधीकाळी ९० एकर जागेत पसरला होता. नव्याने स्थलांतरित झालेला आठवडी बाजाराच्या आधुनिकीकरणासाठी नगर विकास विभाग मंत्रालयाने पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे तलावाचे व बाजाराचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.

साकोलीचे पालटणार रूपडे, तलाव सौंदर्यीकरणासह बगीचा-बोटिंगची व्यवस्था

sakal_logo
By
मनीषा काशीवार

साकोली (जि. भंडारा) : राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला भरणारा अस्ताव्यस्त आठवडी बाजार अशी येथील बाजाराची ओळख होती. परंतु, आता गाव तलावाजवळ बाजारासाठी नियोजनबद्ध रचना करण्यात येणार असून, त्यासाठी नगर विकास मंत्रालयाने बाजार व तलाव सौंदर्यिकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून पार्किंग, भाजीबाजार, मटण मार्केट यांची नगर परिषदेकडून व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे साकोलीचेही रुपडे पालटणार आहे.

साकोली शहरातील तलाव कधीकाळी ९० एकर जागेत पसरला होता. नव्याने स्थलांतरित झालेला आठवडी बाजाराच्या आधुनिकीकरणासाठी नगर विकास विभाग मंत्रालयाने पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे तलावाचे व बाजाराचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.

तलावातील अतिक्रमण काढणार

साकोली शहरातील गाव तलाव म्हणून प्रचलित असलेला तलाव कधीकाळी ९० एकर जागेत पसरला होता. काळाच्या ओघात या तलावाच्या चारही बाजूंनी रस्ते व दुकानांनी अतिक्रमण केल्याने सध्या फक्त ८० एकर जागेत तलाव उरला आहे. याच तलावात शहरातील पंचशील व शिवाजी वॉर्डातील घाण पाणी टाकले जाते. तसेच तलावाच्या काठावर दुकानांचे अतिक्रमण वाढले आहे. जंगली वनस्पतींनी तलावात अतिक्रमण केले आहे.

अवश्य वाचा :  बापरे! पाच दिवसांत १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू, जिल्ह्यात कोरोना ठरतोय कर्दनकाळ

शंकरपटाच्या जागेचेही सौदर्यीकरण

कधीकाळी या तलावात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात होती. त्यावरही आता परिणाम झाला आहे. आता या तलावाचे सौंदर्यीकरण होणार असून नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी नव्याने स्थानांतरित केलेला आठवडीबाजार आणि शंकरपटाच्या जागेचे सौंदर्यीकरण करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.

जाणून घ्या : ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन

आधुनिक आठवडीबाजार, तलावाचे होणार सौंदर्यीकरण

हा तलाव घाणीच्या विळख्यात सापडला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत असलेल्या गाव तलावाच्या सौंदर्यीकरण तीन कोटी तर आठवडी बाजारासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यात तलावाच्या सौंदर्यीकरणात बोटिंग, संगीतमय पाण्याचा फवारा, आकर्षक बगीचा, चौपाटी तलावावर पूल आणि तलावाचे खोलीकरण यांचा समावेश आहे. आठवडी बाजार आधुनिक पद्धतीने भरणार असून पार्किंगची सोय, भाजीपाला, मटण मार्केट, फळभाजी यासाठी प्रत्येकाला दुकान, पाण्याची व्यवस्था आणि विद्युतीकरण व्यवस्था केली जाणार आहे. तसेच रस्ते व पार्किंगची सोय राहणार आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)