
साळींदरसोबतच्या झटापटीत बिबट्याचा मृत्यूड; तब्बल १७ काटे आढळले
नेर (जि. यवतामळ) : शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याचा (leopard) साळींदरसोबत झटापट झाली. या संघर्षात साळींदरचे (Salinder) १७ काटे डोक्यात व चेहऱ्यात शिरल्याने रक्तबंबाळ झालेल्या बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सोनवाढोणा ते बोरगाव रस्त्यावर घडली.
नेर तालुक्यातील सोनवाढोणा ते बोरगाव रस्त्यावर बिबट्या सोमवारी (ता. २८) सकाळी मृतावस्थेत आढळून आला. गावकऱ्यांनी ही माहिती वनविभागाला दिली. नेर वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी रक्त सांडलेले होते. पळसाच्या झाडाच्या वाळलेल्या पानावरही रक्ताचे डाग आढळले.
हेही वाचा: Phone Tapping Case : अतुल लोंढेंच्या निशाण्यावर तत्कालीन गृहमंत्री
घटनास्थळी साळींदरचे (Salinder) काटे सर्वत्र विखुरले होते. रात्री सदर बिबट्या व साळींदरची शिकार करीत असताना त्यांच्यात झटापट झाली. या संघर्षात साळींदरचे १७ काटे बिबट्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर सर्वत्र रोवले गेले. काटे चेहऱ्यावर लागल्यानंतर बिबट्याने (leopard) डोके जमिनीवर घासून यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काटे अधिक खोलवर जाऊन रक्तस्त्राव होऊन बिबट्याचा मृत्यू झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर साळींदरचे बीळ आढळून आले. या अनोख्या संघर्षात साळिंदरासारखा छोटा प्राणी आपला जीव वाचवण्यात समर्थ ठरला तर बिबट्याला आपला जीव गमवावा लागला.
रोह्याच्या पिलाची शिकार
बिबट्याचे (leopard) शवविच्छेदन केले असता त्याने अलीकडेच रोह्याच्या पिल्लाची शिकार केल्याचे दिसून आले. यासोबतच चेहऱ्यावर सतरा ठिकाणी काट्याच्या खोलवर जखमा व मागील पायाच्या मांडीत साडेचार इंच खोल काटा आढळून आला. उंच लांब सडक हा नर बिबट्या सात ते आठ वर्षे वयाचा होता.
वन्यप्राण्यांत नेहमीच संघर्ष होतो. सदर संघर्ष हा साळींदर व बिबट्यात झाली. बिबट्याच्या चेहऱ्यावर काट्याच्या खोल जखमा आहेत. मागच्या मांडीतसुद्धा साडेचार इंच खोल काटा आढळून आला. याआधी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.- केशव वाभळे, उपवनसंरक्षक, यवतमाळ
Web Title: Salinder The Death Of A Leopard As Many As 17 Thorns Were Found Yavatmal District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..