Samruddhi Expressway Accident : समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात १७ जण जखमी ; पीकअपचा टायर निघाल्याने वाहन उलटले

Tyre Detaches From Moving Pickup, Causing Vehicle to Overturn : समृद्धी महामार्गावर तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिकअपचा पुढील टायर निघाल्याने वाहन उलटून १७ मजूर जखमी झाले.
Samruddhi Expressway Accident

Samruddhi Expressway Accident

esakal

Updated on: 

धामणगावरेल्वे : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, कालच सात भाविकांचा बळी घेणाऱ्या भीषण अपघातानंतर शनिवारी (ता. ३) पहाटे पुन्हा एकदा भीषण दुर्घटना घडली. तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीत धावत्या महिंद्रा पिकअप वाहनाचा पुढील डाव्या बाजूचा टायर अचानक निघाल्याने वाहन अनियंत्रित होऊन महामार्गावर उलटले. या अपघातात नऊ मजूर गंभीर, तर आठ जण किरकोळ जखमी झाले.

सर्व १७ जखमींना तातडीने धामणगावरेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील २३ मजूर रोजगारासाठी बुलडाण्याकडे महिंद्रा पिकअप क्रमांक एमएच ३७ टी ४१८३ मधून जात होते. आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक १२७+२०० जवळ अचानक पीकअपचा पुढील डाव्या बाजूचा टायर निघाला.

Samruddhi Expressway Accident
Numerology: या ४ तारखांना जन्मलेल्या मुली वडील आणि नवऱ्यासाठी ठरतात समृद्धीचे प्रतीक! तुमच्या घरातही या तारखेला जन्माला आलीये का मुलगी?

त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव पिकअप महामार्गावर उलटला. वाहन उलटताच आतील मजुरांमध्ये एकच आक्रोश सुरू झाला. कालच्या आठवणी अजूनही ताज्या समृद्धी महामार्गावर गुरुवारी (ता. २) झालेल्या भीषण अपघातात दुर्गादेवीचा रथ घेऊन जाणाऱ्या बोलेरो पीकअपला ट्रकने मागून धडक दिल्याने सात भाविकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेच्या धक्क्यातून परिसर सावरत असतानाच दुसऱ्याच दिवशी पुन्हा पिकअप वाहनाला अपघात झाल्याने समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

क्रेनच्या साहाय्याने वाहन बाजूला अपघातानंतर पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त पिकअप वाहन महामार्गाच्या शोल्डर लेनवर हलविले. घटनास्थळी बॅरिकेड्स व कोन्स लावून वाहतूक सुरक्षित करण्यात आली. तळेगाव दशासर पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा पुढील तपास तळेगाव दशासर पोलिस करीत आहेत.

२० मिनिटांत मदतकार्य सुरू अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस गावनेर, तळेगाव येथील दीपक मांडवे, अश्विन चव्हाण, आकाश राठोड यांनी अवघ्या २० मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून अपघातग्रस्त वाहनातील जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.

Samruddhi Expressway Accident
IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

नऊ मजूर गंभीर जखमी मोहन शिरभाऊ यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून उषा शिवरकर, रीना रामटेके, कमोद भावे, बंडू उरकुडे, योगेश उरकुडे, संजय सोंदरकर, शांता सोनवणे व वंदना बुराडे हे गंभीर जखमी झाले आहेत. किरकोळ जखमींमध्ये रोहित सहारे, अमर सहारे, स्वभा वाघमारे, विनोद रामटेके, अजय राऊत, अशोक कुंबले, महेंद्र शिवरकर व ललिता राऊत यांचा समावेश आहे. सर्व १७ जखमींना तातडीने धामणगावरेल्वे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाहनचालक ओम पंढरी तनपुरे (वय २६, रा. वाकद, ता. रिसोड) यांच्यासह काही प्रवासी बचावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com