esakal | गोंदियात नायब तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला, शासकीय वाहनाच्या फोडल्या काचा
sakal

बोलून बातमी शोधा

sand mafiya attack on deputy tehsildar in gondia

जिल्ह्यातील वाळूघाटांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे अवैधरीत्या वाळू चोरीचे प्रमाण वाढले आहे. वाळूमाफिया अवाजवी दरात वाळूविक्री करून सर्वसामान्यांची अक्षरशः लूट करीत आहेत.

गोंदियात नायब तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला, शासकीय वाहनाच्या फोडल्या काचा

sakal_logo
By
मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया : वाळू चोरीवर आळा घालण्यासाठी चौकशीसाठी गेलेल्या नायब तहसीलदारांवर वाळूमाफियांनी हल्ला केला. ही घटना बोंडराणी येथे गुरुवारी (ता.12) घडली. माफियांनी शासकीय वाहनाच्या काचाही फोडल्या. 

हेही वाचा - घरी सुरू होती दिवाळीची तयारी अन् जवानाच्या वीरमरणाची बातमी आली

जिल्ह्यातील वाळूघाटांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे अवैधरीत्या वाळू चोरीचे प्रमाण वाढले आहे. वाळूमाफिया अवाजवी दरात वाळूविक्री करून सर्वसामान्यांची अक्षरशः लूट करीत आहेत. त्यामुळे याला आळा घालता यावा, वाळूची चोरी थांबावी, यासाठी प्रशासनाने भरारी पथक स्थापन केले आहे. हे पथक वाळूवाघाटावर जाऊन चौकशी करीत आहेत. वाहनाच्या तपासणीअंती काही त्रुटी आढळल्यास दंडात्मक कारवाई करीत आहेत. मात्र, आता वाळूमाफियांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणे सुरू केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हेही वाचा - नागरिकांनो फटाके फक्त दोनच तास वाजवा, अन्यथा होणार कारवाई

तिरोडा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार अप्पासाहेब तुकाराम वनकडे (वय 36) हे गुरुवारी वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथकासह बोंडराणी येथे गेले होते. यावेळी 10 ते 12 वाळूमाफियांनी पथकाच्या शासकीय वाहनाच्या (एमएच 35- ए. जे. 0709) मागे येऊन काचावर थापा मारल्या. तुम्ही येथे का थांबले आहात, येथे थांबायचे नाही, कोणत्याही वाहनाची रॉयल्टी तपासायची नाही, असा दम देत माफियांनी अरेरावी केली. त्यानंतर, एका वाळूमाफियाने वाहनाच्या समोरील काचावर काठी मारून काचा फोडल्या. एवढेच नव्हे, तर नायब तहसीलदार वनकडे यांच्यावर हल्ला केला. या घटनेची तक्रार नायब तहसीलदार वनकडे यांनी दवनीवाडा पोलिसांत केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार देवराम खंडाते करीत आहेत.
 

loading image