esakal | संत गाडगेबाबांनी उभारलेल्या गोरक्षणात आजही गोसेवा
sakal

बोलून बातमी शोधा

संत गाडगेबाबांनी उभारलेल्या गोरक्षणात आजही गोसेवा

आजही हे गोरक्षण लोकांच्या सहभागातून कार्यरत आहे.

संत गाडगेबाबांनी उभारलेल्या गोरक्षणात आजही गोसेवा

sakal_logo
By
शरद केदार

चांदूरबाजार (अमरावती) : गोमातेचे महत्त्व प्राचीन काळापासून सांगण्यात येत असून संत गाडगेबाबा यांनी तालुक्यातील नागरवाडी येथे गोरक्षणाची स्थापना केली होती. या गोरक्षणाच्या चाऱ्यासाठी शासनाने जमीनदेखील दिली होती. आजही हे गोरक्षण लोकांच्या सहभागातून कार्यरत आहे.

हेही वाचा: अमरावती : कार व दुचाकीचा अपघात; तीन जण जागीच ठार

१९५२ साली विश्रोळी येथे संत गाडगेबाबा कीर्तनासाठी आले होते. कीर्तनामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना तुम्ही तुमच्या गायवासरांचे काय करता, असा प्रश्न विचारला होता. त्यावर शेतकरी म्हणाले होते, आम्ही शेतीच्या कामासाठी वापरल्यानंतर त्यांना विकून टाकतो. त्यावर गाडगेबाबा म्हणाले, तुम्ही पाप करता. आपण त्यांच्यासाठी गोरक्षण उभारू. त्यावेळी कीर्तनाला उपस्थित असणारे दादासाहेब देशमुख यांना यासाठी जागा मिळेल का? असे संत गाडगेबाबा यांनी विचारले. त्यावर दादासाहेब म्हणाले, जागा मिळेल. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांसह गाडगेबाबा उजाड असलेल्या नागरवाडी येथे पोहोचले व त्याठिकाणी पहिले गोरक्षण गाडगेबाबांनी उभारले होते.

हेही वाचा: अमरावती जिल्ह्यातील जि.प.च्या शाळांना मिळेना हक्काचे छप्पर

गायींच्या चाऱ्यासाठी शासनाने त्यांना ३० एकर जमीन लीजवर दिली होती. परंतु काही कारणांनी काही वर्षांनी ती जमीन शासनाने परत घेतली. गाडगेबाबांनी स्थापन केलेले ते गोरक्षण आजही सुरू असून त्याठिकाणी सध्याच्या स्थितीत १५ गायी आहेत.

नागरवाडीचे विद्यमान संचालक बापूसाहेब देशमुख लोकांच्या सहकार्याने ते गोरक्षण चालवीत आहेत. तालुक्याला भूषण ठरणारे हे गोरक्षण चालवण्यासाठी लोकसहभागाबरोबरच शासनानेही मदत करणे आवश्यक आहे.

हेही वाचा: अमरावती विभागात डेंगीच्या रुग्णसंख्येत घट, तीन वर्षांत फक्त पाच बळी

चांदूरबाजार तालुका हा महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर असल्यामुळे जनावरांची तस्करी मध्य प्रदेशातून होत असते. काही दिवसांपूर्वी शिरजगाव कसबा पोलिसांनी कंटेनरमधून ६१ जनावरे पकडली होती. त्यामुळे या जनावरांना गोरक्षणात ठेवण्यासाठी या तालुक्यात मोठे गोरक्षण होणे आवश्यक आहे.

हेही वाचा: अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर

लोकसहभागातून गोरक्षण चालविणे थोडे कठीण जाते. त्यामुळे अशा गोरक्षणाला शासनाने मदतीचा हात द्यावा.

- बापूसाहेब देशमुख, संचालक, गोरक्षण, नागरवाडी.

loading image