सावली : झु़डुपे कटाईच्या मजुरावर वाघाचा हल्ला

सावली वनपरिक्षेत्रातील घटना, वनमजुरावर गडचिरोलीत उपचार
 tiger attack
tiger attack sakal

सावली : झुडुपे कटाई करीत असतानाच वाघाने वनमजुरावर हल्ला करून जखमी केले. ही घटना रविवारी (ता. २६) दुपारच्या सुमारास पाथरी उपवन क्षेत्रातील गेवरा बीट क्रमांक १५६ परिसरात घडली. कृष्णा डंबाजी बानबले असे जखमी मजुराचे नाव आहे. त्याला उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या पुढाकारातून तालुक्यातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात वनविभागा सोबत शेतकऱ्यांची समन्वय बैठक घेण्यात आली होती. त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांनी सुचविलेल्या उपाययोजना अमलात आणून वनविभागाने गेवरा बीटाअंतर्गत गेवरा ते करोली रोडलगत असलेली झुडपे कटाईचा निर्णय घेतला. त्यासाठी मजूर लावले. गेवरा बिटात झुडपे कटाईते काम सुरू असतानाच कृष्णा बानबले या मजुरावर वाघाने हल्ला केला. त्याने आरडाओरड केल्याने सोबतीला असलेले मजूर धावत आले.

 tiger attack
विद्यार्थ्यांच्या हितासाठीच आरोग्य भरतीची परीक्षा पुढे ढकलली - राजेश टोपे

मजुराला वाघाच्या तावडीतून सोडविले. त्यामुळे अनुचित घटना घडत टळली. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा केला. जखमी कृष्णा बानबले याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com