Video सिंचन घोटाळा ; अजित पवारांना क्‍लिन चिट दिल्यानंतर आता अधिकाऱ्यांभोवती फास 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत असलेल्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पांतील गैरव्यवहारासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत व प्रतिबंधक विभागाला देण्यात आलेले आहेत. त्यानुसार जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंत्यासह, विभागीय लेखाधिकारी, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता अशा अकरा अधिकाऱ्यांवर सात नवे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. 

नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत असलेल्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पांतील गैरव्यवहारासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत व प्रतिबंधक विभागाला देण्यात आलेले आहेत. त्यानुसार जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंत्यासह, विभागीय लेखाधिकारी, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता अशा अकरा अधिकाऱ्यांवर सात नवे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. 

विदर्भातील सिंचन प्रकल्पांत झालेल्या गैरप्रकारची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका जनमंचने उच्च न्यायालयात सादर केली. विदर्भातील सिंचन घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकांवर अंतिम सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच, हे शपथपत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले. 

 

एसीबीकडून नव्याने सात गुन्हे दाखल 
सदर घोटाळा हा केवळ प्रशासकीय हयगय या स्वरूपातील असून या सिंचन घोटाळ्याची यापूर्वी चौकशी केलेल्या वडनेरे, वांढरे अथवा माधवराव चितळे समितीने अजित पवार यांना या घोटाळ्यासाठी जबाबदार धरले नव्हते. त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी केवळ विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, जलसंपदा विभागाचे सचिव, अवर सचिव यांच्यावरच आहे. त्याशिवाय राज्य सरकारच्या रूल्स ऑफ बिझनेसमध्ये संबंधित खात्याच्या सचिवांनी कोणताही निर्णय घेताना संबंधित मंत्र्यांना माहिती देणे आवश्‍यक आहे. 

तुकाराम मुंढे सकाळी सकाळी डम्पिंग ग्राउंडवर, अधिका-यांना झाड झाड झाडले

अतिरिक्‍त, मुख्य अभियंत्यासह विभागीय लेखाधिकाऱ्यांचा समावेश 
या प्रकरणाची जबाबदारी जलसंपदा खात्याच्या सचिवांवर आहे, असे एसीबीने शपथपत्रात ठळकपणे नमूद केले होते. त्यानुसार एसीबीच्या विशेष तपास पथकातील अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा तपास करून मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेत कार्यकारी अभियंता श्रीपाद मधुकर आपटे, विभागीय लेखाधिकारी सी. टी. जिभकाटे, अधीक्षक अभियंता डी. डी. पोहेकर, मुख्य अभियंता सोपान रा. सूर्यवंशी, कार्यकारी संचालक देवेंद्र परशुराम शिर्के, आसोलामेंढा कालव्यात गुरूदास मांडवकर, संजय लक्ष्मण खोलापूरकर, सोपान सुर्यवंशी, देवेंद्र शिर्के, नेरला (पाधोरा) उपसा सिंचन प्रकल्पात कार्यकारी अभियंता प्रभाकर विठ्ठल मोरघडे, विभागीय लेखा अधिकारी राम पुरूषोत्तम वाईकर, दिलीप पोहेकर, देवेंद्र शिर्के, रोहिदास लांडगे, सोपान सूर्यवंशी, गोसीखुर्द डावा व कालव्यात सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता वसंत ग्यानदेव गोन्नाडे, विभागीय लेखाधिकारी अरूण खेमलाल कोकुडे, सोपान सूर्यवंशी, घोडाझरी शाखा व उजव्या मुख्य कालव्यातील गैरप्रकारात गुरुदास सहदेवराव मांडवकर, देवेंद्र शिर्के, सोपान सूर्यवंशी, संजय खोलापूरकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या; दोन युवकांचा मृत्यू 

ही कारवाई पोलिस अधीक्षक रश्‍मी नांदेडकर व अतिरिक्त पोलिस अधीक्षक व प्रभारी तपास अधिकारी राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात समन्वय अधिकारी मिलींद तोतरे, रविंद्र राऊळ, उपअधीक्षक प्रमोद चौधरी, दिनेश लबडे, प्रफुल्ल गीते, भावना धुमाळे व पोलिस निरीक्षकांनी पार पाडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven offenses were filed against officers of irrigation department