शेगाव संस्थानचा रामनवमी उत्सव स्थगित

gajanan maharaj.
gajanan maharaj.

शेगाव (जि. बुलडाणा) : कोरोना व्हायरस या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील रामनवमीचा उत्सवही स्थगित करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीस शेगाव संस्थानचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

संस्थान प्रतिनिधींची सकारात्मक भूमिका
शेगाव संस्थानचा रामनवमी उत्सव संपूर्ण राज्यात प्रसिध्द आहे. 28 मार्च पासून या उत्सवाला सुरू होणार होती. मात्र, केंद्र सरकारचे ‘नो गॅदरींग’ चे निर्देश पाहता शेगाव संस्थाननेही हा उत्सव स्थगित करावा या मुद्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी राजाराम पुरी, शेगाव संस्थानचे प्रशांत पुरी यांच्यासह काही अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये हा उत्सव स्थगित करण्याबाबत चर्चा झाली. त्यास संस्थांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. त्याची येत्या एक दोन दिवसात औपचारीक घोषणाही होण्याची शक्यता आहे. शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थांनचा हा रामनवमी उत्सव वर्षातील एक मोठ्या उत्सवापैकी एक आहे. उत्सवाला मुंबई, पुण्यासह राज्य व देशातील कानाकोपऱ्यातून भाविकांची हजेरी असते. त्या पार्श्‍वभूमीवर कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची शक्यता पाहता तो स्थगित करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी दिले आहेत.


सार्वजनिक कार्यक्रम रद्द
जिल्ह्यातील सर्वच यात्रा महोतसव तथा शासकीय कार्यक्रम, बक्षीस वितरण कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहे. त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने एक पत्रकच काढले आहे. सोबतच तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार अनुषंगीक सूचना व सर्व संस्थांन आणि यंत्रणेला देणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजाराम पुरी यांनी दिली.

श्री आसरा माता गायगाव यात्रा रद्द
देशात कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन ठेवून गुढीपाडव्याच्या दिवशी गायगाव बु. येथे दरवर्षी आयोजित होणारी आसरा माता यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती श्री आसरा माता संस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून प्रसिध्दीस देण्यात आली आहे. तालुक्यातील गायगाव बु. येथे दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात श्री आसरा माता देवीची यात्रा भरते. यात्रेला हजारोच्या संख्येने भाविकांची गर्दी होते. मात्र यावर्षी कोरोना व्हायरसचा फैलाव होण्याच्या भीतीपोटी संपूर्ण महाराष्ट्रातील यात्रा महोत्सव रद्द करण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com