शिरजगाव मोझरी-अमरावती एसटी फेऱ्या सुरू; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतला पुढाकार

Shirajgaon Mozari Amravati ST rounds start
Shirajgaon Mozari Amravati ST rounds start

तिवसा (जि. अमरावती) : शिरजगाव मोझरी ते अमरावती बस फेऱ्या कोरोनाच्या महामारीमुळे बंद झाल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील धोत्रा, शेंदोळासह इतर गावातील नागरिकांना प्रवासासाठी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. त्याशिवाय वयोवृद्ध नागरिकांनाही प्रवासी सुविधा मिळत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते कल्याण कांबळे यांनी शिरजगाव मोझरी ते अमरावती फेऱ्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे व नियंत्रक अधिकारी यांच्याकडे निवेदनतून केली होती. सोमवारपासून या मार्गावर दोन फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

कोरोना महामारीच्या लॉकडाऊननंतर एसटीची राज्यभरातील सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला त्याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. दरम्यान नुकतेच एसटी महामंडळाने राज्यभरातील एसटी सेवा पूर्ववत सुरू करण्याच्या आदेश राज्य सरकारने एसटी महामंडळाला दिले होते. मात्र, अद्याप शिरजगाव मोझरी ते अमरावती या मार्गावरील फेऱ्या सुरूच करण्यात आल्या नसल्याने या मार्गावरील नागरिक एसटी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत होते.

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते कल्याण कांबळे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर, एसटीचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभने तर एसटी महामंडळाचे राज्याचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना निवेदन देण्यात आले होते.

दरम्यान पालकमंत्री ठाकूर यांनी पुढाकार घेऊन विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून कांबळे यांनी मागणीनुसार एसटीच्या फेऱ्या पूर्ववत सुरू करण्याचे सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एकूण फेऱ्यांपैकी सध्या दोन फेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्याने कांबळे यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

फेऱ्यांना प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद

पहिल्याच दिवशी शिरजगाव मोझरी ते अमरावती धावणाऱ्या फेरीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला आहे. शिरजगाव मोझरी गावात बसमध्ये बसण्यासाठी प्रवाशांची गर्दी दिसून आली असून, याचप्रमाणे या मार्गावरील गावतूनही प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार
शिरजगाव मोझरी ते अमरावती या मार्गावरच्या गावातील युवकांना कंपनीत कामाला जातात तर वयोवृद्धाना त्यांचे पगार घ्यायला जाण्यासाठी किंवा शिकवणी वर्गांसाठी दररोज अमरावती प्रवास करायचा असतो मात्र, प्रत्येकवेळी खासगी गाडी वापरणे शक्य नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक फटका बसत होता. त्यामुळे आता एसटीने फेऱ्या सुरू केल्यानंतर एसटीच्या सुरक्षित आणि विविध योजनेतील तिकीट दरांमध्ये प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. यासाठी पालकमंत्री ठाकूर आणि एसटी महामंडळाचे नागरिकांच्या तर्फे धन्यवाद...
- कल्याण कांबळे,
सामाजिक कार्यकर्ते, शिरजगाव मोझरी

अडचणी दूर होणार
विद्यार्थ्यांना नेहमी अमरावतीला शैक्षणिक कामासाठी प्रवास करायचा असतो. मात्र, एसटी सुरू नसल्याने अनेक अडचणी होत होत्या. आता एसटी फेऱ्या सुरू झाल्याने अडचणी दूर होणार आहे. एसटी फेऱ्या सुरू झाल्याने एसटी महामंडळाचे आभार
- राहुल येरणे,
युवक, शिरजगाव मोझरी

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com