बुलडाण्याच्या अनंता चोपडेला शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार

ananata
ananata

अकोला : मातृतीर्थ बुलडाणा जिल्‍ह्यातील सवणा येथील गरीब कुटुंबातील व अकाेल्याच्या क्रीडा प्रबाेधिनीतील प्रतिभावंत बाॅक्सर अनंता चाेपडेला यंदाचा शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. इंडाेनेशिया येथील प्रेसिंडेट चषक बाॅक्सिंग स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक मिळविले होते.

चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला. त्याने पुरुषांच्या ५२ किलाे वजन गटात गाेल्डन पंच मारला. यासह त्याने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. बुलढाणा जिल्ह्यातील सवणा गावात वडिल प्रल्हाद चाेपडे यांना शेतात मदत करत त्याने बाॅक्सिंगचे धडे गिरवले. यातील आपली प्रतिभा कायम ठेवताना त्याने हा एेतिहासिक यशाचा पल्ला गाठत सुवर्ण पदक मिळवले.

राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंना व प्रशिक्षकांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देवून गौरविण्यात येते. हे पुरस्कार मंगळवारी जाहीर झाले. वऱ्हाडातील अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील खेळाडूंचात्यात समावेश आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्‍यातील रहिवासी व पुणे येथे ॲथलेटिक्सचा सराव करणाऱ्या अर्चना आढावसह बुलडाणा जिल्ह्यातील सावणा येथील रहिवाशी व अकोला क्रीडा प्रबोधिनिचा खेळाडू अनंता चोपडे यांचा पुरस्कार प्राप्त खेळाडूंमध्ये समावेश आहे.


आंतरराष्‍ट्रीय स्तरावर झळकलेला पहिलाच बॉक्सर
अनंताने महाराष्ट्राच्या बाॅक्सिंगमध्ये ऐतिहासिक यशाची नाेंद करताना इंडोनेशियातील स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. ही कामगिरी करणारा तो महाराष्ट्राचा पहिलाच बाॅक्सर ठरला होता. त्याच्या या कामगिरीवर शिव छत्रपती क्रीडा पुरस्काराची मोहोर उमटली आहे.


मेढपाळाच्या मुलाची सर्वोच्च पुरस्काराला गवसणी
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मार्गावरील आडवळणावरचे गाव सावणा. मैदानी खेळासाठी प्रसिद्ध. याच गावच्या मातीतून देशाला सुवर्णपदक जिंकून देणारा मुष्टीयोद्धा (बॉक्सर) मिळाला आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत जगण्याचा संघर्ष वाट्याला आलेला असताना अनंता चोपडने याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आकाशाला गवसणी घालणारे यश मिळविले आहे. त्याचे वडील प्रल्हाद चोपडे मेंढ्या चराईचे काम करतात. ते अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. श्री चंदनशेष क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक करवंदे यांनी अनंतातील क्रीडा नैपुण्य हेरून त्याला प्रोत्साहित केले. दहा वर्षांचा असताना अनंताची शासनाच्या अकोला येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये निवड झाली होती. अकरा वर्षे त्याने राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रशिक्षक सतीशचंद्र भट्ट यांच्या तालमीत प्रशिक्षण घेतले. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र संघातही त्याची कामगिरी सुवर्णमय राहिली. शिवछत्रपती पुरस्कार खेळाडू तथा भारतीय संघाचे प्रशिक्षक गिरीश पवार यांचे मार्गदर्शन अनंताला लाभत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सिंगापूर, इंडोनेशिया येथे त्याने देशासाठी सुवर्णपदक मिळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com